पिंपरी-चिंचवडमधील कला प्रदर्शन थेट दिल्लीत
नवरात्रीनिमित्त 'सृजन' या चित्रकला प्रदर्शनाचे नुकतेच दिल्लीत उद्घाटन करण्यात आले. या विशेष प्रदर्शनात ४ कलासाधक आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून आपली शैली आणि विषयांची झलक सादर करणार आहेत. हे प्रदर्शन १० ऑक्टोबरपर्यंत संस्कार भारती कला संकुल, ३३, पंडित दीनदयाल उपाध्याय मार्ग, दिल्ली या ठिकाणी खुले असल्याचे सांगण्यात आले.
संस्कार भारती, पिंपरी-चिंचवड समिती वतीने आयोजित 'कला संकुल' येथे उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारचे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट महासंचालक संजीव गौतम होते. यांच्यासह अखिल भारतीय संघटन मंत्री अभिजित गोखले, निवृत्त जनरल एस.पी. सिन्हा, ललित कला अकादमीचे शैलेश श्रीवास्तव उपस्थित होते. अभिजित गोखले यांनी सांगितले की, कला संकुलात नवरात्रीच्या काळात सृजन प्रदर्शनाचे आयोजन केले जात असले, तरी या कला सर्व प्रकारच्या कला पद्धती आणि कला उपक्रम नियमितपणे सुरू असतात. शक्तीच्या उपासनेचा उत्सव चालू आहे आणि शक्ती ही सृष्टीची देवी मानली जाते. विशेषत: प्रामुख्याने तीन शैली दर्शवल्या गेल्या आहेत, ज्याची प्रेरणा शतकानुशतके सर्व चित्रकारांना देत आहे. अजिंठा शैली चित्रप्रदर्शन प्राचीन काळापासून चित्रकारांवर प्रभाव टाकते. संजीव गौतम यांनी आपल्या भाषणात चित्रांच्या प्रदर्शनाची पाहणी करताना सांगितले की, भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असलेले आपले सर्व कलाकार आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून भारतीय कला संस्कृतीच्या परंपरेला जोडून त्यांचे संवर्धन करत आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने, चित्रकलेच्या माध्यमातून ही देवीची स्तुती आहे, म्हणूनच शक्तीच्या उपासनेच्या उत्सवात संबंधित प्रदर्शनासाठी आयोजक अभिनंदनास पात्र आहेत.
राजश्री तावरे, सोपान तावरे, लीना आढाव, प्रफुल्ल भिष्णूरकर सदस्य उपस्थित होते. चित्रकलेमध्ये ॲक्रेलिक रंगांचा वापर करून महिला आणि मायबोलीवर आधारित चित्रे, अजिंठा चित्रशैली आणि प्रतिबिंबावरील कलाकृती, शिवशक्ती आणि स्लेटवरील कोरीव कला, निसर्गातिल आकार ठळकपणे प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.