पुणे-लोणावळा उपनगरी सेवेला ४६ वर्षे पूर्ण

पुण्याची उपनगरी रेल्वेसेवा अर्थातच 'पुणे सबअर्बन रेल्वे नेटवर्क' अशी ओळख असलेल्या पुणे-लोणावळा लोकल सेवेला ११ मार्च २०२४ रोजी ४६ वर्ष पूर्ण झाली. याबाबत दररोज प्रवास करणारे नागरिक, प्रवासी संघटना यांनी आनंद व्यक्त केला.

संग्रहित छायाचित्र

ग्रामीण भागासाठी लोकल सेवा ठरली वरदान, नोकरदार, शेतकरी, व्यापाऱ्यांसह सर्वांच्या जीवनातील अविभाज्य घटक

पंकज खोले
पुण्याची उपनगरी रेल्वेसेवा अर्थातच 'पुणे सबअर्बन रेल्वे नेटवर्क' अशी ओळख असलेल्या पुणे-लोणावळा लोकल सेवेला ११ मार्च २०२४ रोजी ४६ वर्ष पूर्ण झाली. याबाबत दररोज प्रवास करणारे नागरिक, प्रवासी संघटना यांनी आनंद व्यक्त केला.

११ मार्च १९७८ रोजी पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरी ईएमयू लोकल सेवेला आरंभ झाला, सुरुवातीला ७ डबे असलेली ईएमयू लोकल धावली नंतर ९ डबे करण्यात आले,  तर आता सध्या १२ डब्यांची ईएमयू लोकल धावते. ग्रामीण भागासाठी ही लोकल वरदान ठरली आहे. नोकरदार, शेतकरी, व्यापारी अजूनही या लोकलचा वापर करतात. त्यामुळे अनेकांचा एक जीवनाचा भाग बनलेली ही उपनगरी सेवेला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत.

गेल्या ४६ वर्षांचा इतिहास पाहिला तर एकदाही पुण्याला नवीन फ्रेश फॅक्टरी आऊट ईएमयू रेक मिळाला नाही. मुंबई उपनगरांमध्ये वापरून पुण्याला दिलेल्या जुन्या रेकमधूनच पुणे-लोणावळा प्रवास होत आहे. 

यंदा तरी पुण्याला बंबार्डिअर किंवा मेधा ईएमयूचा नवीन रेक मिळावा,अशी अपेक्षा पुणे ते लोणावळा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. अनेकदा मागणी करूनही पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्यांमध्येही वाढ झालेली नाही. आता स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम लोणावळा ते पुणे दरम्यान पूर्ण झाल्याने प्रवाशांकडून कार्यालयीन वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी होत आहे. तसेच सर्वच स्टेशनवरील फलाटांची लांबी वाढवली असल्याने सकाळच्या व सायंकाळच्या काही फेऱ्या या १५ डब्यांच्या लोकलने पण चालवता येऊ शकतील. याचबरोबर महिला व विद्यार्थी वर्गाचा या लोकलवर मोठा विश्वास असल्याने या वर्गासाठी स्वतंत्र योजना सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनेचे इकबाल मुलानी केली आहे.

उपनगरीय लोकलचे टप्पे :

 १९७८ ते २००७-०८ सालापर्यंत पुणे लोकल ही डीसी (डायरेक्ट करंट) लोकल म्हणून धावत होती.

 २००९-१० मध्ये भेल चा रेक पुण्याला मिळाला.

 २०१४-१५ मध्ये एसी (अल्टरनेट करंट) ईएमयू धावू लागली.

  २०१५ ते १८ या काळात रेट्रोफिटेड रेक चा वापर करून लोकल धावू लागली.

  २०१८ ते आत्तापर्यंत सिमेन्स रेक पुणे ते लोणावळा दरम्यान धावत आहे.

 पुणे व लोणावळा चौपदरीकरण काम मार्गावर

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest