Seva Vikas Bank : सेवा विकास बँकप्रकरणात १२२ कोटींची मालमत्ता जप्त

पिंपरी येथील सेवा विकास सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणात अटकेतील आरोपींची आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्य आणि संस्था, गाडी, घर अशा ४७ मालमत्ता मिळून एकूण १२२.३५ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ट्वीटद्वारे ही मािहती दिली आहे. सुमारे ४२९ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सेवा विकास बँक बुडाली असून, तिचे सर्व व्यवहार रिझर्व बँकेने बंद केले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 20 May 2023
  • 02:58 pm
सेवा विकास बँकप्रकरणात १२२ कोटींची मालमत्ता जप्त

सेवा विकास बँकप्रकरणात १२२ कोटींची मालमत्ता जप्त

#पिंपरी

पिंपरी येथील सेवा विकास सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणात अटकेतील आरोपींची आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्य आणि संस्था, गाडी, घर अशा ४७ मालमत्ता मिळून एकूण १२२.३५ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ट्वीटद्वारे ही मािहती दिली आहे. सुमारे ४२९ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सेवा विकास बँक बुडाली असून, तिचे सर्व व्यवहार रिझर्व बँकेने बंद केले आहेत.

सेवा विकास सहकारी बँकेच्या ४२९ कोटी रुपयांच्या मनी लाॅड्रिंग प्रकरणात ईडीने माजी उपमहापौर अमर मुलचंदानी यांच्यासह इतर काही जणांना अटक केली होती. कोणत्याही ठोस आर्थिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता सहकारी बँकेचे व्यवस्थापन कौटुंबिक व्यवसायाप्रमाणे केले जात असल्याचा आरोप करण्यात आला.

कोणत्याही योग्य त्या सुरक्षिततेशिवाय आणि अर्जदारांच्या पतपात्रतेचा विचार न करता कर्ज मंजूर केले जात होते. अशी जवळपास ९२ टक्के खाती असल्याचे समोर आले होते. त्यामुळे बँक आता दिवाळखोरीत गेली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना ईडीने १२२.३५ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जप्त केली आहे.

feedback@civicmirror.in

Share this story