संग्रहित छायाचित्र
पिंपरी न्यायालय, पुणे जिल्हा विधी प्राधिकरण आणि पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन यांच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतचे शनिवार (दि. १४) रोजी पिंपरी न्यायालय नेहरुनगर येथे आयोजन करण्यात आले होते.
पिंपरी नेहरुनगर न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे एकूण २३८ खटले निकाली काढण्यात आले. त्यामुळे १ कोटी ७२ लाख ७३८ रुपये किमतीचे दावे निकाली निघाले, तर आकुर्डी न्यायालयात येथे दाखलपूर्व पाणीपट्टी व मिळकतकराची एकूण ८९४ खटले निकाली काढण्यात आले. त्यामध्ये १ कोटी ५४ लाख २३ हजार ८२ रुपये महसूल जमा झाला. वाहतूक चलनाच्या प्रकरणात ६२ हजार २००/- दंड जमा झाल्याने एकूण ३ कोटी २६ लाख ८६ हजार २० रुपयांचा महसूल दंड स्वरूपात शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. यामध्ये पिंपरी नेहरुनगर न्यायालयाचे यांनी तर पॅनल ॲडव्होकेट म्हणून ॲड. विवेक राऊत, ॲड. अस्मिता पिंगळे, ॲड. निधी बारमेडा व ॲड. बरखा पालवे यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाची सुरुवात पिंपरी न्यायालयातील उपस्थित न्यायाधीश व पिं. चिं. ॲड. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. याप्रसंगी प्रमुख न्यायाधीश गजभिये यांनी उपस्थित वकील व पक्षकारांना लोकअदालतीचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले. यावेळी राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापक, नागरिक व मोठ्या प्रमाणात वकील बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रीना मगदूम, सहसचिव ॲड. राकेश जैद, खजिनदार ॲड. अक्षय फुगे, सदस्य ॲड. मानसी उदासी, ॲड. संकेत सरोदे, ॲड. विकास शर्मा, ॲड. संघर्ष सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. उमेश खंदारे व आभार ॲड. संकेत सरोदे यांनी मानले.
सख्ख्या भावांमधील वाद मिटला
तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या दोन साख्या भावांमधील वाद अखेर संपुष्टात आला. न्यायप्रलंबीत असलेला एक दिवाणी दावा व एक फौजदारी प्रकरण सामंजस्याने मिटवले. या दोघा भावांमध्ये दिवाणी दावा तसेच कुलमुखत्यारपत्राअन्वये खरेदीखत रद्दबाबत खटला सुरू होता. लोकअदालतमध्ये एकत्रित येऊन सामंजस्याने वाद मिटवण्याचे दोघांमध्ये ठरले. या दोन्ही प्रकरणांमध्ये ॲड. योगेश थंबा-कव्हेकर व वादी तथा फिर्यादी यांच्या वतीने ॲड. उज्ज्वला पिलाने यांनी राष्ट्रीय लोकअदालतीचे औचित्य साधून त्यावर तोडगा काढून प्रकरण निकाली काढले. दोघांच्या समजुतीने दोन्ही दिवाणी व फौजदारी प्रकरण निकाली काढण्यात आले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.