'दुधाई'च्या योगदानाची जगाने घेतली दखल, दुग्धदानाने वाचवले अनेक बालकांचे प्राण, गीनिजकडून जागतिक विक्रमाची नोंद

टेक्सास : गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद करण्यासाठी बरेच जण काय काय वेगवेगळे प्रयत्न करत असतात. मात्र अमेरिकेमधील टेक्सास येथील एका महिलेने अनोख्या समाज सेवेच्या माध्यमातून गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

दुग्धदानाने वाचवले अनेक बालकांचे प्राण

टेक्सास : गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद करण्यासाठी बरेच जण काय काय वेगवेगळे प्रयत्न करत असतात. मात्र अमेरिकेमधील टेक्सास येथील एका महिलेने अनोख्या समाज सेवेच्या माध्यमातून गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. या महिलेने मातृत्वाचे आणि वात्सल्याचे दर्शन घडवले आहे. नवजात बालकांसाठी संजीवनी असणारे स्तनपान आणि स्तनातून बाहेर पडणारे दूध सर्वाधिक प्रमाणात दान करण्याचा विक्रम या महिलेने नोंदवला आहे. या महिलने स्वत: चक्क २ हजार ६४५.५८ लिटर दूध दान केले आहे. कोणत्याही महिलेने यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्तनपानासाठीचे दूध दान केलेले नाही.

एलसी ओग्लीट्री असे या ३६ वर्षीय महिलेचे नाव आहे. ही महिला नॉर्थ टेक्सास मिल्क बँकेशी संलग्न आहे. तिने यापूर्वी २०१४ सालापासून अस्तित्वात असलेला १५६९.७९ लिटर दूध दान करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. जुलै २०२३ पासून ही महिला स्तनपानासाठी दूध दान करत आहे. तिने दान केलेल्या दुधाचे प्रमाण हे आधीच्या विक्रमाला मागे टाकणारे आहे. तिने दान केलेल्या दुधामुळे वेळेआधी जन्माला आलेल्या साडेतीन लाख बालकांना वाचवण्यासाठी मदत झाली आहे. या महिलेने २०१० साली आपल्या पहिल्या मुलाला म्हणजेच केलीला जन्म दिला. त्यावेळीच आपल्या स्तनांमध्ये बाळाला गरज असलेल्या प्रमाणापेक्षा अधिक दूध निर्माण होत असल्याचे एलसीच्या लक्षात आले. आमचे पहिले बाळ केली रुग्णालयामध्ये होते. त्यावेळेसच मला जाणवले की, आपल्या शरीरात अधिक दूध तयार होत आहे. तेव्हा मला नर्सने हे दूध तुम्ही दान करू इच्छिता का? असे विचारले. तोपर्यंत मला हे अशा पद्धतीने स्तनांमध्ये निर्माण होणारे दूध दान करता येते याचीही कल्पना नव्हती, असे एलसी सांगते. एलसीने गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांना, मी यामधून पैसे कमवत नाही. चांगल्या कामासाठी पैसे घेता कामा नये असे मला वाटते, असे सांगितले. एलीसीने दान केलेल्या दुधामुळे सरोगसीच्या माध्यमातून जन्मलेल्या बाळांबरोबरच आरोग्यविषयक समस्या असलेल्या बालकांनाही मदत झाली आहे. आपल्या शरीरामध्ये एवढ्या प्रमाणात दूध का निर्माण होते हे शोधण्याचा एलीसीने कधी प्रयत्न केला नाही. मात्र आपण भरपूर पाणी पितो, उत्तम आहार घेतो, असे एलसी म्हणाली आहे.

लोकचळवळीसाठी घेतला पुढाकार

आपण दान केलेल्या दुधाचा एखाद्या बालकाचे प्राण वाचवण्यासाठी उपयोग होतो ही भावना फार सुंदर असल्याचे एलसी सांगते. आपल्याप्रमाणेच अनेक महिलांनी समोर येऊन स्तनपानासाठी आवश्यक असणारे दूध दान करावे यासाठी एलीसी आता जनजागृती मोहीम राबवत असून या माध्यमातून अधिक चिमुकल्यांचा जीव वाचवता येईल, अशी तिला अपेक्षा आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story