अतिशयोक्तीपूर्ण आरोप

हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉन्सनवर काही काळापूर्वी ‘रेड वन’ चित्रपटाच्या सेटवर उशिरा पोहोचल्याचा आरोप करण्यात आला होता. काही वृत्तांमध्ये असाही दावा करण्यात आला होता की, तो सेटवर गैरवर्तन करतो. जॉन्सनने या सर्व आरोपांवर आपले मौन सोडले आहे.

संग्रहित छायाचित्र

हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉन्सनवर काही काळापूर्वी ‘रेड वन’ चित्रपटाच्या सेटवर उशिरा पोहोचल्याचा आरोप करण्यात आला होता. काही वृत्तांमध्ये असाही दावा करण्यात आला होता की, तो सेटवर गैरवर्तन करतो. जॉन्सनने या सर्व आरोपांवर आपले मौन सोडले आहे. तो म्हणाला, ‘‘मी कधीकधी सेटवर उशिरा पोहोचतो, पण मीडियामध्ये दाखवत आहे तितका उशीरा येत नाही.

एका मुलाखतीत, ड्वेन जॉन्सनने त्याच्या उशीर होण्याच्या सवयींबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे दिली. ‘‘जे रिपार्ट्स आले ते पूर्णपणे बरोबर नव्हते. बहुतेक अतिशयोक्तीपूर्ण होते. पण काही गोष्टी खऱ्या होत्या. मी काही वेळा सेटवर विलंबाने पोहोचलो आहे. मी नेहमी म्हणालो की मी इथे आहे, मला विचारा आणि मी तुम्हाला सत्य सांगेन,’’ असे जाॅन्सनने सांगितले.

 याव्यतिरिक्त, जॉन्सनने कबूल केले की त्याने सेटवर पाण्याच्या बाटल्यांमध्ये लघवी केली. तो म्हणाला, ‘‘होय, मी कामाच्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्यांमध्ये लघवी केली आहे. पण मी कधी कधी सेटवर आठ तास उशिरा आलो, असे कधीही घडले नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवणे हा पूर्ण मूर्खपणा आहे. मला कामाची जबाबदारी घ्यायला आवडते.’’

‘रेड वन’चे दिग्दर्शक जेक कासदान यांनी ड्वेन जॉन्सनचे समर्थन करताना म्हटले, ‘‘जॉन्सन कधीही आपले काम सोडत नाही. होय, तो कधीकधी सेटवर उशिरा पोहोचू शकतो. पण सेटवर उशिरा पोहोचणे ही हॉलिवूडमध्ये सामान्य गोष्ट आहे. हे प्रत्येकासोबत घडते.’’ ड्वेन जॉन्सनचा सह-अभिनेता ख्रिस इव्हान्सनेही त्याला पाठिंबा दिला ‘‘जॉन्सन कधी येणार हे संपूर्ण टीमला चांगले ठाऊक आहे, त्यामुळे वेळेचा अपव्यय होत नाही,’’ असे त्याने सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story