निजामाच्या मालमत्तेचा वाद चव्हाट्यावर; मालमत्तेवर हजारो वंशजांनी केला दावा

हैद्राबादचे शेवटचे निजाम मुकर्रम जाह याचे गेल्या वर्षी इस्तंबूलमध्ये निधन झाले. हैद्राबादचा निजाम हा सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहे. निजामाला पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत माणूस असे संबोधले जायचे. स्वातंत्र्याच्या वेळी निजाम उस्मान अली खान हा जगातील सर्वात श्रीमंती व्यक्ती होता.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

२३० अब्ज डॉलर्स संपत्तीसाठी न्यायालयात सुरू आहेत खटले

हैद्राबाद: हैद्राबादचे शेवटचे निजाम मुकर्रम जाह याचे गेल्या वर्षी इस्तंबूलमध्ये निधन झाले. हैद्राबादचा निजाम हा सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहे. निजामाला पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत माणूस असे संबोधले जायचे. स्वातंत्र्याच्या वेळी निजाम उस्मान अली खान हा जगातील सर्वात श्रीमंती व्यक्ती होता. त्यावेळी त्याची संपत्ती ही  १७.४७ लाख कोटी म्हणजेच २३० अब्ज डॉलर्स इतकी होती. या मालमत्तेचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. निजामाचे कुटुंबीय आता हजारो कोटींच्या मालमत्तेसाठी कायदेशीर लढाई लढत आहेत.

या कायद्याच्या लढाईत प्रामुख्याने शेवटचा शासक मीर उस्मान अली खान आणि आसफझाही यांचा नातू प्रिन्स मुकर्रम जाह यांच्या मुलांचा समावेश आहे. याशिवाय निजाम पहिले  ते सातपर्यंतचे वंशजांनीही या कायद्याच्या लढाईत उडी मारली आहे.  नुकतेच मुकर्रम जाह याचा दुसरा मुलगा अलेक्झांडर आझम जाह याने हैदराबाद शहर दिवाणी न्यायालयात रिट याचिका दाखल करून निजामाच्या जंगम आणि मालमत्तेत २/६ वाटा असल्याचा दावा केला आहे. आझम जाह यांनी निजामाच्या ६ मालमत्तांमध्ये आपला वाटा मागितला आहे. यामध्ये फलकनुमा पॅलेस, चौमहाल्ला पॅलेस, चिरन किल्ला, जुनी हवेली, हैद्राबादमधील नाझरी बाग पॅलेस यांचा समावेश आहे. याशिवाय उटी येथे बांधण्यात आलेल्या सेडर पॅलेसमध्येही त्याने वाटा मागितला आहे. याशिवाय दुर्मीळ कलाकृती, पर्शियन गालिचे, चित्रे, झालर, संगमरवरी शिल्पे, जुन्या रोल्स रॉयस कार, तलवारी, बंदुका आणि दागिने यावरही  दावा करण्यात आला आहे.

आझम शाह याच्या म्हणण्यानुसार या मालमत्तांची किंमत सुमारे १,२७६ कोटी रुपये असेल.  यापैकी २/६ मालमत्तेवर त्याचा हक्क आहे. आझम जाह सध्या ऑस्ट्रेलियात राहतो. मुकर्रम जाह याची दुसरी पत्नी हेलन आयेशा जाह यांचा तो मुलगा आहे. तर अजमाद जाह हा मुकर्रम जाह याचा मोठा मुलगा आहे. अजमाद जाह हा चित्रपट निर्माता, प्रोफेशनल फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर असून सध्या तो लंडनमध्ये राहतो. तुर्कस्तानमध्ये मुकर्रम जाह याच्या मृत्यूनंतर आझम जाह याने त्याचे पार्थिव घेऊन हैद्राबादला येऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. आझम जाह याने दावा केला होता की, व्हिसा न मिळाल्याने तो हैद्राबादला येऊ शकला नाही. त्याचा मोठा भाऊ अजमत जाह आणि त्याची आई एसरा येगने यांना सर्व मालमत्ता ताब्यात घ्यायची आहे आणि तसेच या संपत्तीची विक्री करायची आहे. तिच्या वडिलांनी इतर चार महिलांशीही लग्न केल्याचे त्याने सांगितले. यातील अजमत जाहची आई एसरा, आयेशा आणि इतरांसोबत त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांना मेहेर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र, ते त्यांना मिळाले नाही. आझम जाह म्हणाला की, आता तोही  निजामाच्या संपत्तीत  वाटा मागत आहे.  

पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत माणूस

१७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम उस्मान अली खान याने भारतीय लष्करापुढे शरणागती पत्करली तेव्हा त्याच्याकडे २३० अब्ज डॉलरची संपत्ती होती. त्याला मीर आझम जाह आणि मीर मोअज्जम जाह अशी दोन मुले होती. याशिवाय आझम जाह यांचा मुलगा नातू मुकर्रम जाह यालाही त्याने मालमत्तेत वाटा दिला. त्याला निजाम आठव्याचा दर्जा देण्यात आला. १९६७ मध्ये आजोबाच्या निधनानंतर मुकर्रम जाह हा आठवा निजाम मानला जात असे. हैद्राबादमध्ये ६ राजवाड्यांव्यतिरिक्त निजामाची संपूर्ण भारतात मालमत्ता आहे. आता या मालमत्तेची लढाई केवळ आझम जाह आणि त्याचा भाऊ अजमत जाह यांच्यात नाही तर आसफ जाही घराण्यातील इतर वंशजांमध्येही सुरू झाली आहे. रौनक यार खान, निजाम सहावा, मीर महबूब अली खान यांचा नातू जो निजाम नववा म्हणून निवडून आला आहे. मात्र, अजमत शाहच्या राज्याभिषेकाला त्यांचा विरोध आहे. निजाम पहिला ते निजाम सहावापर्यंत आसफ जाही घराण्याचे ४५०० वंशज आहेत. त्यापैकी २८०० जिवंत असून त्यांनी मजलिस-ए-साहेबजादा सोसायटी स्थापन केली आहे, तर  निजाम तवेन मीर उस्मान अली खान यांचे आणखी २४ वंशज आहेत. त्यांनी देखील संपत्तीत वाटा मागितला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story