संग्रहित छायाचित्र
बीजिंग : चीन पाकिस्तानला ४० हायटेक फायटर जेट देऊ शकतो. बीजिंग आणि इस्लामाबादमध्ये याबद्दल जोरात चर्चा सुरू आहे. ही डील फायनल झाली तर पाकिस्तानकडे चिनी बनावटीच्या जे-१३५ ए मल्टी-रोल फायटर जेटची तुकडी असेल. जे-१३५ ए ताफ्यात असलेला पाकिस्तान जगातील पहिला आणि एकमेव देश असेल.
जे-१३५ ए स्टेल्थ फायटर जेट आहे. अमेरिकेनंतर चीनकडेच पाचव्या पिढीची स्टेल्थ फायटर विमाने आहेत. पाकिस्तानकडे अमेरिकेने दिलेली एफ-१६ आणि फ्रान्सची मिराज फायटर विमाने आहेत. पाकिस्तान आता ही विमाने बदलण्याचा विचार करत आहे. हाँगकाँगस्थित चायना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्ट्नुसार, चीन दोन वर्षांपेक्षा पण कमी वेळात पाकिस्तानला ४० फायटर जेट देणार आहे. पाकिस्तानी एअरफोर्सने आधीच ही विमान विकत घ्यायला मंजुरी दिली आहे. शेनयांग जे-१३५ ए स्टेल्थ दोन इंजिनचे फायटर जेट आहे. हे सिंगल सीटर विमान आहे. जमीन आणि समुद्र दोन्ही ठिकाणी कारवाई करण्यासाठी हे फायटर जेट सक्षम आहे. जे-१३५ ए ला जे-२० नंतर विकसित करण्यात आले आहे. हे पाचव्या पिढीचे स्टेल्थ फायटर विमान आहे.
जे-१३५ ए ची डिझाइन यूएस लॉकहीड मार्टिनच्या एफ-३५ सारखी आहे. फरक इतकाच आहे की, पहिले ट्विन इंजिन आहे आणि दुसरे सिंगल इंजिन. चीनला अमेरिकी विमानांच्या डिझाइनची नक्कल करण्यासाठी ओळखले जाते. जे-२० आणि एफ-२२ रॅप्टरच्या डिझाइनमध्येही भरपूर साम्य आहे. चेंगदू जे-१० हे अमेरिकेच्या एफ-१६ ची कॉपी वाटते. जे-१३५ ए स्टेल्थ आणि काऊंटर-स्टेल्थ दोन्ही युद्ध लढण्यास सक्षम आहे. जे-१३५ ए स्टेल्थ फायटर जेटची सर्वात पहिली झलक नोव्हेंबर महिन्यात झुहाई शहरात वार्षिक एअरशोमध्ये पाहायला मिळाली होती. त्यावेळी पाकिस्तानी एअर फोर्सचे अधिकारी तिथे उपस्थित होते. पाकिस्तानी एअर फोर्सचे प्रमुख एअर मार्शल जहीर अहमद बाबर सिद्धू यांनी सांगितले की, जे-३१ स्टेल्थ फायटर जेट मिळवण्याची पूर्वतयारी झालेली आहे. जे-३१ हे जे-३५ ए चे लँड व्हर्जन आहे. चिनी सैन्यानुसार जे-१३५ ए ला एअर कॉम्बॅट ऑपरेशनसाठी डिझाइन केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.