इराणची हवाई सुरक्षा उद्ध्वस्त; इस्राएलच्या हल्ल्यात संरक्षण व्यवस्थेचे धिंडवडे, युद्धविरामाची बोलणी निष्फळ

तेहरान : इस्राएल आणि हमास युद्ध पेटलेले होते. त्या युद्धात इराणने उडी घेतली. इराणने इस्राएलवर १ ऑक्टोबर रोजी भीषण हल्ला केला. त्या हल्ल्यात इस्राएलचे मोठे नुकसान झाले नाही. परंतु त्यानंतर इस्राएलने आपण बदला घेणार असल्याचे जाहीर केले.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

तेहरान : इस्राएल आणि हमास युद्ध पेटलेले होते. त्या युद्धात इराणने उडी घेतली. इराणने इस्राएलवर १ ऑक्टोबर रोजी भीषण हल्ला केला. त्या हल्ल्यात इस्राएलचे मोठे नुकसान झाले नाही. परंतु त्यानंतर इस्राएलने आपण बदला घेणार असल्याचे जाहीर केले. शनिवारी (२६ ऑक्टोबर) इस्राएलने इराणवर हल्ला केला. इस्राएलने या हल्ल्यात इराणच्या लष्करी तळ, इंधन पुरवठा केंद्रांना लक्ष्य केले. तसेच सीरियातही हल्ले केले. इराणच्या तीन अधिकाऱ्यांनी इस्राएलच्या या हल्ल्यात इराणची हवाई संरक्षण रडार यंत्रणा उद्ध्वस्त झाल्याचे मान्य केले आहे.

इराणी अधिकाऱ्यांनी म्हटले की, इस्राएलने तेहरान, खुजेस्तान आणि इलाम प्रांतातील काही लष्करी तळांच्या काही भागांना लक्ष्य केले आहे. तेल आणि पेट्रोकेमिकल रिफायनरीसाठी तैनात असलेली हवाई संरक्षण रडार यंत्रणा निकामी केली. इस्राएलच्या या हल्ल्यात ज्या हवाई संरक्षण यंत्रणेस फटका बसला ती म्हणजे खुजेस्तान प्रांतातील विशाल इमाम खोमेनी पेट्रोकेमिकल येथे बसवलेली प्रणाली होती. त्याच्या जवळ असलेले इमाम खोमेनी हे मोठे आर्थिक बंदर आणि अबदान ऑइल रिफायनरी यांचे संरक्षण करण्यासाठी तैनात करण्यात आलेली हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त झाली. इराणी अधिकाऱ्यांनी म्हटले की, तांगे बिजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इलाम प्रांतातील गॅस फील्ड रिफायनरीमधील हवाई संरक्षण यंत्रणेलाही फटका बसला आहे. यापैकी एक इराणच्या तेल मंत्रालयाशी संबंधित आहे. हवाई रडार यंत्रणा उद्ध्वस्त केल्यामुळे इराणसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष सुरूच राहिला तर भविष्यात इराणमधील इतर ऊर्जा प्रकल्प आणि आर्थिक केंद्रही धोक्यात येऊ शकतात, असे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

इराणच्या तेल आणि वायू उद्योगातील तज्ज्ञ आणि इराण-इराक चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य हमीद हुसेनी यांनी सांगितले की, इस्राएलने आम्हाला स्पष्ट संदेश दिला आहे. त्यातून आम्ही धोके समजून घेणे गरजेचे आहे. यापुढे तणाव निर्माण होऊ देऊ नये. आता इराणने पुन्हा इस्राएलवर हल्ला केला तर या युद्धात अमेरिकाही सामील होऊ शकते. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest