झहीर खानसारखी ॲक्शन असलेल्या चिमुकलीसाठी मास्टरब्लास्टरचा पुढाकार; सचिनमुळे मिळणार दमदार गोलंदाज

सचिन तेंडुलकरने एखाद्या क्रिकेटपटूच कौतुक केले तर त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी खास असणार. तो उदयोन्मुख क्रिकेटर असेल, तर त्याच्याकडे सगळ्यांचेच लक्ष जाईल. कदाचित त्याचे नशिबही पालटेल. असेच काहीसे होऊ शकते एका १२ वर्षांच्या छोट्या मुलीसोबत.

Sachin Tendulkar,cricketer,emerging cricketer,MasterBlaster, Zaheer Khan

संग्रहित छायाचित्र

Sachin Tendulkar,cricketer,emerging cricketer,MasterBlaster, Zaheer Khan

मुंबई : सचिन तेंडुलकरने एखाद्या क्रिकेटपटूच कौतुक केले तर त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी खास असणार. तो उदयोन्मुख क्रिकेटर असेल, तर त्याच्याकडे सगळ्यांचेच लक्ष जाईल. कदाचित त्याचे नशिबही पालटेल. असेच काहीसे होऊ शकते एका १२ वर्षांच्या छोट्या मुलीसोबत. तिच्यासाठी सचिन तेंडुलकरने खास पोस्ट केली आहे.  तिच्या मदतीसाठी आता देशातील सर्वात मोठे उद्योगपती पुढे आले आहेत. ही १२ वर्षांची चिमुकली मुलगी आहे, सुशीला मीणा. ती राजस्थानात राहते. सध्या ती तिच्या बॉलिंग अ‍ॅक्शनमुळे चर्चेत आहे.

मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुशीलाच्या बॉलिंगचा व्हीडीओ व्हायरल होत आहे. एका गावातील छोट्याशा मैदानात ती बॉलिंग करताना दिसतेय. पण हा व्हीडीओ फक्त बॉलिंगमुळे नाही, तर अ‍ॅक्शनमुळे चर्चेत आहे. स्लो मोशनमध्ये या व्हीडीओत सुशीला डावखुरी वेगवान गोलंदाजी करताना दिसते. तिचा हा व्हीडीओ पाहून भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची आठवण येते. सचिनने शुक्रवारी (दि. २०) त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सुशीलाचा हा व्हीडीओ पोस्ट केला. यात सुशीलाची बॉलिंग ऍक्शन स्मूद आणि सुंदर असल्याचे सचिनने म्हटले आहे. सचिनने झहीर खानला टॅग करत सुशीलाच्या अ‍ॅक्शनमध्ये झहीर खानची झलक दिसते असे म्हटले. झहीरनेसुद्धा सचिनच्या मताशी सहमती दर्शवली. अ‍ॅक्शन खूप प्रभावी आणि दमदार असल्याचे झहीरने लिहिले आहे.

राजस्थानच्या एका शेतकरी कुटुंबातून येणारी सुशीला एका प्रायमरी शाळेत शिकते. ती क्रिकेट कशा परिस्थितीत खेळत असेल, तिच्याकडे काय साधने असतील? हे सांगणे कठीण आहे. पण शहरांच्या तुलनेत हे सोपे नसेल. तिच्या टॅलेंटला योग्य दिशा देण्यासाठी मदतीची गरज आहे. सचिनच्या या पोस्टने अपेक्षित होते ते काम झाले आहे. सचिनच्या या पोस्टला देशातील सर्वात मोठा औद्योगिक समूह आदित्य बिर्ला ग्रुपने प्रतिसाद दिला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest