मेलबर्न राहुलनंतर रोहितलाही दुखापत

बॉक्सिंग-डे कसोटीपूर्वी मेलबर्नमध्ये सराव सत्रादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या डाव्या पायाला दुखापत झाली. यानंतर त्याने सराव टाळला.ही घटना रविवारी (दि. २२) घडली. आकाशदीपच्या चेंडूवर त्याला ही दुखापत झाली. यानंतर तो आईस पॅक लावताना दिसला.

 Boxing-Day Test,Melbourne ,practice,Rohit Sharma ,Indian captain

संग्रहित छायाचित्र

सरावादरम्यान भारतीय कर्णधाराच्या पायावर आदळला चेंडू, अर्धा तास बर्फ लावला, दुखापत गंभीर नसल्याची आकाशदीपची माहिती

बॉक्सिंग-डे कसोटीपूर्वी मेलबर्नमध्ये सराव सत्रादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या डाव्या पायाला दुखापत झाली. यानंतर त्याने सराव टाळला.ही घटना रविवारी (दि. २२) घडली. आकाशदीपच्या चेंडूवर त्याला ही दुखापत झाली. यानंतर तो आईस पॅक लावताना दिसला. चेंडू लागल्यावर रोहितने नेटमध्ये फलंदाजी केली नाही. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील चौथा सामना गुरुवार २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.यासाठी दोन्ही संघ मेलबर्नमध्ये दाखल झाले असून त्यांचा सराव जोरात सुरू आहेत.

रविवारच्या सराव सत्रादरम्यान रोहितने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर सराव केला, तर विराट कोहलीने थ्रोडाउनसह सराव केला. बुमराहने नेटमध्ये बराच काळ रोहितला गोलंदाजी केली. त्यानंतर रोहितने आकाशदीप आणि हर्षित राणा यांना गोलंदाजी करायला सांगितले. काही काळ सराव केल्यानंतर आकाशदीपचा एच चेंडू रोहितच्या पायावर जोरात आदळला. त्यावर रोहित गमतीने आकाशला म्हणाला, ‘‘हमें ही मारिएगा...’’

एक दिवसापूर्वी नेट प्रॅक्टिस दरम्यान सलामीवीर केएल राहुलच्या मनगटावर चेंडू लागला होता. त्यानंतर टीम इंडियाच्या फिजिओने त्याच्यावर उपचार केले. एका व्हिडिओमध्ये राहुल उपचारादरम्यान उजवा हात धरलेला दिसत आहे. राहुल सध्याच्या दौऱ्यात फॉर्मात आहे, त्याने सहा डावात ४७च्या सरासरीने २३५ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत दोन अर्धशतके झळकावली आहेत. यशस्वी चौथ्या कसोटीत जयस्वालसोबत डावाची सलामी देण्यासाठी सज्ज आहे.

दुखापत गंभीर नाही...

कर्णधार रोहितची दुखापत गंभीर नसल्याची माहिती वेगवान गोलंदाज आकाशदीपने पत्रकार परिषदेत दिली. सरावादरम्यान त्याचाच चेंडू आदळल्याने रोहितला ही दुखापत झाली. आकाश म्हणाला, ‘‘सरावाच्या वेळी खेळाडूंना दुखापत होत असते. रोहितची दुखापत गंभीर नाही. पण धोका पत्कराला नको म्हणून त्याने नंतर सराव टाळला.’’ बॉक्सिंग डे कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवली जाणार आहे. तीन सामन्यांनंतर पाच सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे.

विराट सचिनचा हा विक्रम मोडणार?

 मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नजरा महान खेळाडू सचिन तेंडुलकरच्या आणखी एका विक्रमावर असतील. एमसीजीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, दोन्ही खेळाडूंच्या धावांमधील फरक फारसा नाही. चौथ्या कसोटीच्या दोन्ही डावात मिळून विराटने १३४ धावा केल्या तर तो इतिहास रचेल.

विराट कोहलीने आतापर्यंत मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या सहा डावात ५२.६६ च्या उत्कृष्ट सरासरीने ३१६धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या नावावर एक शतक आणि दोन अर्धशतके आहेत. या यादीत अव्वल स्थानावर असलेल्या ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरच्या नावावर पाच सामन्यांच्या दहा डावांमध्ये ४४.९० च्या सरासरीने ४४९धावा आहेत. आता सचिन आणि विराट यांच्यात केवळ १३४ धावांचा फरक आहे. यावेळी, एमसीजीवर विराट इतिहास रचण्याकडे लक्ष देईल कारण यानंतर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येईल की नाही, हे निश्चित नाही.

या यादीतील दुसरा खेळाडू अजिंक्य रहाणे आहे. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रहाणेने याच मैदानावर शतक झळकावून भारताला विजय मिळवून दिला होता. रहाणेने येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या सहा डावात ७३.८० च्या उत्कृष्ट सरासरीने ३६९ धावा केल्या आहेत. विनू मंकडनंतर अजिंक्य रहाणे हा या मैदानावर दोन शतके करणारा दुसरा भारतीय ठरला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest