Magnus Carlsen : 'जीन्स' घातली म्हणून जगज्जेता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेसाठी अपात्र

नवी दिल्ली : प्रख्यात बुद्धिबळपटू, पाच वेळा जगज्जेता मॅग्नस कार्लसनला 'फिडे'च्या ड्रेस कोडचे उल्लंघन केल्या प्रकरणी जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. स्पर्धेवेळी जीन्स परिधान केल्याबद्दल त्याला २०० डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 29 Dec 2024
  • 07:43 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : प्रख्यात बुद्धिबळपटू, पाच वेळा जगज्जेता मॅग्नस कार्लसनला 'फिडे'च्या ड्रेस कोडचे उल्लंघन केल्या प्रकरणी जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. स्पर्धेवेळी जीन्स परिधान केल्याबद्दल त्याला २०० डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईचा निषेध करत यापुढे फेडरेशन इंटरनॅशनल डे चेसच्या (फिडे) कोणत्याही स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाही, असे कार्लसनने जाहीर केले आहे.

स्पर्धेच्या नियमांनुसार जीन्स घालण्यास मनाई जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेच्या नियमांनुसार जीन्स घालण्यास मनाई आहे. स्पर्धेतील तिसरी फेरी सुरू असताना कार्लसन याला ड्रेस कोडचे पालन करण्याची विनंती करण्यात आली. मात्र त्याने आठव्या फेरीअखेरही आपली भूमिका कायम ठेवत आपण तत्काळ ड्रेस बदलणार नाही उद्या ड्रेस कोडचे पालन करू, असे त्याने सांगितले. यानंतर नवव्या फेरीसाठी आयोजकांनी कार्लसनला पेरिंगमधून वगळले. यामुळे तो अपात्र ठरला. या कारवाईचा निषेध करत यापुढे फेडरेशन इंटरनॅशलन डे चेसच्या (फिडे) कोणत्याही स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाही, असे कार्लसनने जाहीर केले.

फेडरेशन इंटरनॅशनल डे चेसने  (फिडे) सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ड्रेस कोडचे नियम खेळाडूंना स्पष्टपणे समजावून सांगण्यात आले होते. पोशाखाबाबतचे नियम फिडे ॲथलिट्स कमिशनच्या सदस्यांनी तयार केले आहेत. यामध्ये व्यावसायिक खेळाडू आणि तज्ज्ञ आहेत. हे नियम वर्षानुवर्षे लागू आहेत. याची सर्व स्पर्धक खेळाडूंना माहिती आहे. तसेच प्रत्येक स्पर्धेपूर्वी त्यांना याची माहिती दिली जाते. मॅग्नस कार्लसनने जीन्स घालून ड्रेस कोडचे उल्लंघन केले. त्याला पोशाख बदलण्याची विनंती करण्यात आली मात्र त्याने ती मान्य केली नाही. त्यामुळे त्याला अपात्र ठरवावे लागले. जीन्स घालण्यास मनाई असल्याचे दीर्घकाळ चाललेल्या नियमांमध्ये स्पष्ट आहे. ड्रेस कोड उल्लंघन प्रकरणी कार्लसनला २०० डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

फिडेला कायमचा रामराम
अतिशय हास्यास्पद नियम असून यापुढे 'फिडे'च्या कोणत्याही स्पर्धामध्ये सहभागी होणार नाही, अशी घोषणाच प्रसारमाध्यमांशी बोलताना कार्लसनने केली आहे. फिडेच्या ड्रेस कोड धोरणाला कंटाळल्यामुळे यापुढे त्यांच्या कुठल्याच स्पर्धेत सहभागी होणार नाही. मी फिडेला कंटाळलो आहे आणि आता हे नियम स्वीकारू शकत नाही. मला सर्वांची माफी मागायची आहे. हा अतिशय हास्यास्पद नियम असल्याचेही त्याने नमूद केले. दरम्यान मॅग्नस कार्लसन हा नॉर्वेचा ग्रँडमास्टर असून, तो जगात पहिल्या क्रमांकाचा अव्वल मानांकित बुद्धिबळपटू आहे. २६ एप्रिल २००४ साली वयाच्या फक्त तेराव्या वर्षी तो ग्रँडमास्टर झाला होता. तब्बल पाच वेळा जगज्जेता होण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे

Share this story

Latest