‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’साठी जसप्रीत बुमराहला नामांकन; हॅरिस रौफ आणि मार्को यान्सनही शर्यतीत

दुबई : भारताच्या जसप्रीत बुमराहचे नाव नोव्हेंबरच्या आयसीसी प्लेयर ऑफ द मंथच्या शर्यतीत सामील झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत त्याने आठ विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहसोबतच पाकिस्तानचा हरिस रौफ आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्को जॉन्सन यांनाही नामांकन मिळाले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Machale
  • Fri, 6 Dec 2024
  • 06:13 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

महिलांमध्ये बांगलादेशच्या फलंदाजाचा समावेश

दुबई : भारताच्या जसप्रीत बुमराहचे नाव नोव्हेंबरच्या आयसीसी प्लेयर ऑफ द मंथच्या शर्यतीत सामील झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत त्याने आठ विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहसोबतच पाकिस्तानचा हरिस रौफ आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्को जॉन्सन यांनाही नामांकन मिळाले आहे.

महिला गटात बांगलादेशच्या शर्मीन अख्तर, इंग्लंडच्या डॅनी व्याट-हॉज आणि दक्षिण आफ्रिकेच्या नादिन डी क्लर्क यांना नामांकन मिळाले. महिलांमध्ये, तिन्ही नामांकन फलंदाजांना गेले, तर पुरुषांमध्ये, तिन्ही नामांकन गोलंदाजांना मिळाले आहे.

नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे आणि टी-२० मालिका खेळली गेली. पाकच्या या वेगवान गोलंदाजाने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये १० बळी घेतले होते, ज्याच्या मदतीने संघाने २० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका जिंकली.

तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये रौफने स्फोटक ग्लेन मॅक्सवेललाही पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले होते. रौफला एकदिवसीय सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर ३ टी-२० लढतींत ५  विकेट्स घेतल्या. म्हणजेच नोव्हेंबरमध्ये त्याने ६ सामन्यात १५ विकेट घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सन हा पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने अवघ्या १३ धावांत ७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे श्रीलंकेचा डाव अवघ्या ४२ धावांवर गारद झाला. त्याने दुसऱ्या डावात पुन्हा ४ बळी घेतले. एकूण ११ विकेट घेतल्याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.

कसोटीपूर्वी यान्सनने भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत फलंदाजीत चमकदार कामगिरी केली होती. तिसऱ्या टी-२० मध्ये त्याने केवळ १७ चेंडूत ५४ धावा केल्या, तर चौथ्या टी-२०मध्ये त्याने २९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने दोन्ही सामने गमावले असले तरी यान्सनची कामगिरी उत्कृष्ट होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमराहने भारताचे नेतृत्व केले. रोहित शर्मा पितृत्व रजेमुळे पर्थमध्ये सामना खेळू शकला नाही. प्रथम खेळताना टीम इंडियाला केवळ १५० धावा करता आल्या, येथे कर्णधार बुमराहने संघात पुनरागमन केले. त्याने अवघ्या ३० धावांत ५ बळी घेत ऑस्ट्रेलियाला १०४ धावांवर रोखले.

त्यानंतर बुमराहने दुसऱ्या डावात ४२ धावांत ३ बळी घेतले आणि भारताने २९५ धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला. या कामगिरीसाठी बुमराहला सामनावीर म्हणून निवडण्यात आले आणि भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशच्या महिला खेळाडूंची महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत अष्टपैलू नदिन डी क्लर्कने ८० धावा केल्या आणि ४ विकेट्सही घेतल्या. डॅनी व्याटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १६३.२१ च्या स्ट्राइक रेटने १४२ धावा केल्या आणि त्याच्या संघाला ३-० ने मालिका जिंकून देण्यात मदत केली.

 शर्मीन अख्तरने आयर्लंडविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये सुमारे ७० च्या सरासरीने १३९  धावा त्यानंतर डिसेंबरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडेत शर्मीनने ७२ धावा केल्या. या जोरावर बांगलादेशने मालिका ३-० ने जिंकली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest