Yuzvendra Chahal : घटस्फोटांच्या अफवांदरम्यान स्टार फिरकीपटू चहलला आणखी एक मोठा धक्का.. ! जाणून घ्या, आता काय घडलं...?

भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. घटस्फोटांच्या अफवांदरम्यान आता त्याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 9 Jan 2025
  • 02:33 pm
 Yuzvendra Chahal,

प्रातिनिधिक छायाचित्र....

Yuzvendra Chahal : भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सुमारे 6-7 महिन्यांपूर्वी चहल टीम इंडियाचा एक महत्वपूर्ण भाग होता आणि T20 विश्वचषक जिंकून परतला होता. पण गेले 6 महिने त्याच्यासाठी खूप वाईट गेले. टीम इंडियामधून त्याचा पत्ता कट झाला आणि त्याला बाहेर बसावं लागलं. त्यामध्येच सध्या चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा विभक्त होत असल्याच्या बातम्याही वारंवार समोर येत आहेत. यामुळेच हा फिरकी गोलंदाज सध्या कठीण काळातून जात आहे. वैयक्तिक आयुष्यातील कठीण काळात, हरियाणाच्या या फिरकी गोलंदाजाला आता आणखी एक धक्का बसला आहे कारण त्याला विजय हजारे ट्रॉफीसाठी हरियाणा संघातून वगळण्यात आले आहे.

चहलला संघातून का वगळलं...?

दरम्यान,  हरियाणाने गेल्या वर्षी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते आणि त्यात चहलची विशेष भूमिका होती. गेल्या हंगामात हरियाणाच्या जेतेपदाच्या विजयादरम्यान तो 18 विकेट्ससह सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. असं असतानाही चहलला स्पर्धेच्या गट टप्प्यातही स्थान देण्यात आले नव्हते आणि आता त्याला बाद फेरीच्या सामन्यांसाठीही संघात स्थान देण्यात आलेले नाही. उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाचा सामना बंगालशी होईल. गतविजेत्यांनी त्यांच्या अनुभवी लेग-स्पिनरला वगळून तरुण खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ते तरुण फिरकी गोलंदाज पार्थ वत्सला भविष्यासाठी तयार आहेत आणि चहललाही याबद्दल माहितीही देण्यात आली आहे.

हरियाणा क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्यानं सांगितले की,  "चहलला संघात निवडलं नाहही, यामागे त्याचं कारण वैयक्तिक आयुष्य नसून क्रिकेटशी संबंधित कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.  भविष्यासाठी नवीन फिरकीपटू तयार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आणि निवडकर्त्यांनी याबाबत चहलशीही चर्चा केली, तो त्यासाठी तयार होता, असेही त्यांनी नमूद केलं आहे.

अजूनही आयपीएलची संधी....

चहल हा सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये संघाचा भाग होता आणि तो सतत खेळत होता, मात्र आता त्याला विजय हजारे ट्रॉफीमध्ये संधी मिळालेली नाही. अंस असलं तरी चहल अजूनही क्रिकेटपासून पूर्णपणे दूर झालेला नाही कारण त्याच्याकडे अजूनही आयपीएलची संधी आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या चहलला नवीन हंगामासाठी आयोजित मेगा लिलावात पंजाब किंग्जने 18 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले. यामुळे तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा फिरकी गोलंदाज ठरला. चहल सलग 3 सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग होता, तिथे त्याने पर्पल कॅपही जिंकली होती. आयपीएल 2025 चा नवा सीझन हा 15 मार्चपासून सुरू होणार आहे.

अशी आहे चहलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द...

एकेकाळी चहल हा एकदिवसीय आणि टी-20 दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा मुख्य फिरकी गोलंदाज होता. 2016 मध्ये पदार्पण केल्यापासून त्याने 72 एकदिवसीय आणि 80 टी-20 सामने खेळले आहेत, दोन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 121 आणि 96 विकेट्स घेतल्या आहेत. या लेग-स्पिनरने भारतासाठी शेवटचा टी-20 सामना ऑगस्ट 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता, तर तो त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना जानेवारी 2023 मध्ये इंदूर येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.

Share this story

Latest