Cristiano Ronaldo: उणे २० डिग्री थंड पाण्यात मारली डुबकी, लॅपलँडमधील व्हीडीओ होतोय सुपरहिट

फुटबॉलचा सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डो कधी त्याच्या खेळामुळे तर कधी मैदानाबाहेरील कामांमुळे चर्चेत राहतो. यावेळी तो एका नव्या पराक्रमामुळे चर्चेत आला आहे. खरंतर, रोनाल्डोने एक स्टंट करून ख्रिसमस साजरा केला आहे. हा स्टंट पाहून सगळेच थक्क झाले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 29 Dec 2024
  • 05:48 pm

संग्रहित छायाचित्र

फुटबॉलचा सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डो कधी त्याच्या खेळामुळे तर कधी मैदानाबाहेरील कामांमुळे चर्चेत राहतो. यावेळी तो एका नव्या पराक्रमामुळे चर्चेत आला आहे. खरंतर, रोनाल्डोने एक स्टंट करून ख्रिसमस साजरा केला आहे. हा स्टंट पाहून सगळेच थक्क झाले.

 

रोनाल्डोने बर्फाळ पाण्यात उडी मारली महान पोर्तुगीज फुटबॉलपटू आपल्या संपूर्ण कुटुंबासह लॅपलँड (फिनलँड) येथे ख्रिसमसची सुटी साजरी करण्यासाठी गेला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एक खास व्हीडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो बर्फाळ पाण्यात डुबकी मारताना दिसत आहे. या व्हीडीओमध्ये त्याच्या आजूबाजूला बर्फ असल्याचे दिसत आहे.

 

प्रचंड थंडी असूनही तो बर्फाळ पाण्यात शिरला. रोनाल्डोने संपूर्ण व्हीडीओ त्याच्या यूट्यूब चॅनलवरही अपलोड केला आहे. रोनाल्डो कुटुंबासह सुटी साजरी करतोय. यूट्यूबवर अपलोड केलेल्या व्हीडीओमध्ये ३९ वर्षीय रोनाल्डो आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करताना दिसत आहे. यामध्ये त्याची पत्नी जॉर्जिना रॉड्रिग्ज आणि त्यांच्या मुलांचा समावेश आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano)

व्हीडीओमध्ये, तो असे म्हणताना ऐकू येतो की, माझ्यासाठी ही खूप खास वेळ आहे कारण ही अशी वेळ आहे जी सहसा आपल्याकडे नसते. १० मिनिटांच्या या व्हीडीओमध्ये रोनाल्डोने त्याच्या ख्रिसमस सेलिब्रेशनची झलक दाखवली. लॅपलँडमध्ये तो सांताक्लॉजलाही भेटला. याशिवाय त्याने त्याच्या संपूर्ण कुटुंबासह ख्रिसमस साजरा केला. व्हीडीओच्या शेवटी फुटबॉलपटूने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आणि आगामी वर्ष त्यांच्यासाठी व्यावसायिक भरभराटीचे आनंदाचे जावो, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

Share this story

Latest