Chandrakant Patil : महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी - चंद्रकांत पाटील

'महिला कुटुंबातील सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतात. परंतु संकोचामुळे छोटे मोठे आजार अंगावर काढतात, वेळीच प्रतिबंधात्मक उपाय आणि तपासण्या केल्यास आजार बळावत नाही.'

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 18 Sep 2023
  • 05:13 pm
Chandrakant Patil : महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी - चंद्रकांत पाटील

महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी - चंद्रकांत पाटील

महिलांनी कुटुंबाच्या आरोग्याबरोबर स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने आरोग्य शिबिरांचे आयोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पाटील मार्गदर्शन करीत होते.

यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमीटेड (एमएनजीएल)चे संचालक संजय शर्मा, संचालिका भाग्यश्री मंथाळकर, सचीव श्रेया प्रभूदेसाई, राहूल पाखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, 'महिला कुटुंबातील सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतात. परंतु संकोचामुळे छोटे मोठे आजार अंगावर काढतात, वेळीच प्रतिबंधात्मक उपाय आणि तपासण्या केल्यास आजार बळावत नाही.'

पाटील पुढे म्हणाले, 'कोरोनाच्या साथीनंतर आरोग्य सुविधांवरील मर्यादा लक्षात आल्या आहेत. त्यामुळे आजार होण्याआधीच त्यावर प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत. त्यासाठी वेळेवर आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. असे मत पालकमंत्री, चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.'

राजेश पांडे म्हणाले, एमएनजीएलने पाच महिन्यांपूर्वी गरजू नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी मोबाईल मेडिकल व्हॅन उपलब्ध करून दिली होती. या व्हॅनच्या माध्यमातून 12 हजार नागरिकांची कर्करोग, मधुमेह, रक्त, कोलेस्टेरॉल अशा तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये मेमोग्राफी, स्तनांचा कॅन्सर, तोंडाचा कर्करोग अशा महागड्या तपासण्यांचा समावेश होता. राहूल पाखरे यांनी प्रास्वाविक, डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest