निकालानंतर शरद पवार महायुतीला पाठिंबा देतील; भाजप नेते नारायण राणे यांचा दावा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (दि. २२) जाहीर झाल्यानंतर शरद पवार हे महायुती सोबत हातमिळवणी करू शकतात, असा खळखळजनक दावा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (दि. २२) जाहीर झाल्यानंतर शरद पवार हे महायुती सोबत हातमिळवणी करू शकतात, असा खळखळजनक दावा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे. त्यांच्या पक्षातील आमदारांच्या हितासाठी आणि राज्याच्या हिताच्या निर्णयासाठी शरद पवार कोणत्याही क्षणी महायुतीला पाठिंबा देतील, असे मला वाटते, असे देखील राणे यांनी म्हटले आहे.

राज्यामध्ये कोणतेही परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार नसल्याचा दावा राणे यांनी केला आहे. शरद पवार हे उद्धव ठाकरे किंवा काँग्रेससोबत राहणार नाहीत. शरद पवार हे महायुती सोबत हातमिळवणी करू शकतात, या राणे यांच्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.

शरद पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्णपणे कलाटणी मिळू शकते. त्यामुळे आता या घटना घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरदेखील टीका केली. संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली असून शिवसेनेचे पूर्वीसारखे वर्चस्व राहिले नसल्याचे राणे यांनी म्हटले आहे.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest