कोल्हापूर ते चंद्रपूर, जिथे जातो तिथे अदानी : उद्धव ठाकरे

मुंबईतील बीकेसीत मविआच्या उमेदवारांसाठी जाहीर प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीवर सडकून टीका केली. महायुती सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी उद्योग समूहाला दिल्याने त्यावर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

हे संकट फार मोठं आहे. जसं आपण म्हणतो की आसमानी आणि सुलतानी, तसं आपल्या महाराष्ट्राच्यासमोर अदानीची सुल्तानी हे फार मोठं संकट आहे.  आम्ही फेक नरेटिव्ह बोलत असू तर धारावीसाठी या सरकारने जे आदेश काढले आहेत, ते काय आहेत, अबसा सवाल करीत  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी-अदानी संबंधावरून सरकारचे वाभाडे काढले. कोल्हापूर पासून ते चंद्रपूर, जिथे जातो तिथे अदानी दिसतात. खाणी ते शाळाही अदानीला दिल्या.  मिठागर अदानीला, दहीसर टोलनाका अदानीला, मुलुंडचा टोलनाका अदानीला, कुर्ल्याची मदर डेअरी अदानीला. हे सरकारचेच आदेश आहेत. हे तर काही फेक नरेटिव्ह नाहीत. नंतर आपलं सरकार आल्यानंतर मी ते आदेश फेकून फाडून देईन, असे ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईतील बीकेसीत मविआच्या उमेदवारांसाठी जाहीर प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीवर सडकून टीका केली. महायुती सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी उद्योग समूहाला दिल्याने त्यावर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. महायुती सरकारने फक्त धारावी नाही तर अनेक क्षेत्रात अदानी उद्योह समूहाला प्रकल्प दिल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि चंद्रपूरचंदेखील उदाहरण दिलं. “महायुती सरकार नुसती धारावी नाही तर अख्खी मुंबई ही अदानीच्या घशात घालत आहे. जिथे जातो तिथे अदानी. मी प्रचाराची सुरुवात केली कोल्हापूरपासून, तेथील राधानगरीचे आमदार के. पी. पाटील म्हणाले की, आमच्या इथलं पाणीसुद्धा अदानीला विकलेलं आहे. चंद्रपूरमध्ये गेलो. तिथल्या खाणी आणि शाळा अदानींना दिलेल्या आहेत. पालघरला गेलो, तेथील वाढवण बंदर झाल्यानंतर अदानीला देऊन टाकणार आहेत. विमानतळ अदानी, बंदर अदानी, वीज अदानीकडे, खाणी अदानीकडे, सगळे उद्योगधंदे अदानीकडे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी हे सरकार अदानींच्या दावणीला बांधले गेल्याचा घणाघात केला. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest