सरवणकरांचे धनुष्यबाण ठाकरेंनी केले सरळ !

राज्यातील माहीम विधानसभा मतदारसंघ सध्या हायवोल्टेज मतदारसंघ ठरला आहे. कारण, या मतदारसंघातून राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे उभे आहेत. तर, त्यांच्याविरोधात विद्यमान आमदार सदा सरवणकर निवडणूक लढवत आहेत. हे दोघेही प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात पहिल्यांदाच आमने- सामने आले. यावेळी अमित ठाकरेंनी केलेल्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सिद्धिविनायक मंदिरात आमने-सामने आल्यावर दिल्या परस्परांना शुभेच्छा, अमित ठाकरेंनी केलेली कृती चर्चेत

मुंबई: राज्यातील माहीम विधानसभा मतदारसंघ सध्या हायवोल्टेज मतदारसंघ ठरला आहे. कारण, या मतदारसंघातून राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे उभे आहेत. तर, त्यांच्याविरोधात विद्यमान आमदार सदा सरवणकर निवडणूक लढवत आहेत. हे दोघेही प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात पहिल्यांदाच आमने- सामने आले. यावेळी अमित ठाकरेंनी केलेल्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मतदानाच्या निमित्ताने मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात अमित ठाकरे आणि सदा सरवणकर दर्शनाकरता गेले होते. यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मंदिरात बाप्पाकडे काय मागितले असे विचारले असता अमित ठाकरे म्हणाले, मी बाप्पाकडे काही मागत नसतो. अशा महत्त्वाच्या प्रसंगी मी मंदिरात येतो. बाप्पाने मला आधीच खूप काही दिले आहे.  फक्त मी आशीर्वाद घेण्याकरता येथे आलो आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना त्यांच्या समोरच सदा सरवणकरही माध्यमांशी बोलत होते. तेवढ्यात माध्यम प्रतिनिधींनी या दोघांचीही भेट घालून दिली. दोघांनीही एकमेकांकडे पाहून हस्तांदोलन केले अन् एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

सदा सरवणकर म्हणाले, मी सर्वच उमेदवारांना मन:पुर्वक शुभेच्छा देतो. हा लोकशाहीचा महोत्सव आहे. यात सर्वंच उमेदवार जिंकता आले असते तरी चांगले झाले असते. दरम्यान, शुभेच्छा दिल्यानंतर अमित ठाकरेंचे लक्ष सदा सरवणकर यांच्या खिशाला लावलेल्या धनुष्यबाणावर गेले.  त्यांच्या खिशावरील धनुष्यबाण खालच्या बाजूने झुकले होते. त्यामुळे लागलीच अमित ठाकरे यांनी ते सरळ केले आणि ते पुढे निघाले. आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या चिन्हाचा मान त्यांनी राखल्याने त्यांच्या कृतीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest