‘प्रहार’चा मुख्यमंत्री होऊ शकतो : बच्चू कडू

राजकारणात काहीही होऊ शकते. झारखंडमध्ये एक आमदार मुख्यमंत्री होऊ शकतो. राज्यातील परिस्थिती बघता प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असे वक्तव्य प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी केले आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

राजकारणात काहीही होऊ शकते. झारखंडमध्ये एक आमदार मुख्यमंत्री होऊ शकतो. राज्यातील परिस्थिती बघता प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असे वक्तव्य प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी केले आहे. तर महाविकास आघाडीमधील पक्ष निवडणुकीनंतर एक राहणार नाही, त्यांना आमच्यासोबत यावे लागेल, असेही ते म्हणाले.  

मतदानाचा टक्का वाढला आहे. त्याला विविध कारणे आहेत. निवडणुकीत लाडक्या बहीण योजनाचा परिणाम दिसेल. त्याच हिशोबाने सरकारने योजना आणली होती. पण सरकार बनवण्याची संधी आम्हाला आहे. राज्यात आमच्यासारखे लहान पक्ष आणि अपक्ष सरकार बनविणार आहेत. महाविकास आघाडी किंवा महायुतीला आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल, असा दावादेखील कडू यांनी केला.

महाविकास आघाडीतील  पक्ष एकत्र राहणार नाही. त्यांना आमच्यासोबत यावे लागेल. आम्ही सत्ता स्थापन करणार हे सुर्यप्रकाशाइतके सत्य आहे. बाकीच्या लोकांना आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल.  भाजपने अतिशय खालच्या पातळीवर प्रचार केला. एकंदरित काँग्रेस आणि भाजप हे संभ्रमात होते. शेवटच्या क्षणी भाजपने काँग्रेस चालवा असे सांगितले तर कुठे काँग्रेसने भाजपला मतदान करा असे सांगितले. यात दोघेंही एकमेंकाशी लढत राहिले. त्यांनी निवडणूक जिकंण्यासाठी नाही तर मला पराभूत करण्यासाठी लढवली. पण माझे मतदार पक्के आहेत त्यांनी मलाच मतदान केले असेही बच्चू कडू म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest