मला संपवून टाकाल का ? फडणवीसांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारे आक्रमक
ड्रग्ज माफिया ललीत पाटीलला अटक केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की, बोलणाऱ्यांची तोंडं बंद होतील. हा इशारा आहे की धमकी आहे. तोंडं बंद कराल म्हणजे काय कराल. संपवून टाकाल का?, अशा शब्दात बोलताना शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायाला मिळाले.
राज्यात ड्रग्ज रॅकेट चालवण्याचा आरोप असलेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी बुधवारी (१८ ऑक्टोबर) अटक केली. यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ललित पाटीलच्या अटकेवर बोलताना आता बोलणाऱ्याची तोंडं बंद होतील, असं वक्तव्य करत सूचक इशारा दिला. यावर सुषमा अंधारे प्रचंड आक्रमक झाल्या आहेत
देवेंद्र फडणवीस यांच्याववक्तव्याबद्दल प्रश्न विचारताच सुषमा अंधारे म्हणाल्या की, “मलिक, देशमुख आणि राऊतांना अडकवलं तसं मला अडकवाल. अडकवाल तर कशात अडकवाल. आयुष्यभर संवैधानिक भाषा सांगत आली आहे. आयुष्यभर कायदे आणि कलमं याशिवाय काहीही बोललेले नाही. तुम्ही मला अडकवलं तरी कशात अडकवाल? देवेंद्र फडणवीस हे विसरत आहेत की, ते एका पक्षाचे नेते नाहीत, तर ते या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत. या राज्यातील प्रत्येक नागरिकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्यांना त्यांचं आणि माझं काही शत्रुत्व आहे असं का वाटत आहे.”