मावळमध्ये उमेदवार कोण, भाजपला चिंता नाही - चंद्रशेखर बावनकुळे
मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार भाजप, शिवसेना की राष्ट्रवादी कोणाचा असेल, याची आम्हाला कोणतीही चिंता नाही. भाजप महायुतीचे 45 हून अधिक खासदार निवडणूक आणणार असून मावळमधून महायुतीचा उमेदवार निवडून आणू, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा बुधवारी (दि.11) घेतला. त्यासाठी ते पिंपरी-चिंचवडमध्ये आले असताना ते बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार आश्विनी जगताप, उमा खापरे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आदी उपस्थित होते. मावळ लोकसेभत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे असून मागील निवडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार लढले होते. आगामी लोकसभेसाठी मावळमधून उमेदवारीचे काय, असे विचारल्यानंतर बावनकुळे म्हणाले की, आम्हाला जुळवून घेताना कोणीतही कसरत करावी लागत नाही. आम्हाला उमेदवार कोण, याची चिंता नाही. त्याची काळजी करणार नाही. पूर्ण ताकदीने महायुतीच्या विजयाची तयारी आम्ही करत आहोत. महायुती राज्यात ४५ पेक्षा अधिक जागा जिंकणार आहे. तसेच, बारामती लोकसभेत शंभर टक्के महायुती जिंकणार असून ५१ टक्के आम्हाला मिळतील.
प्रकाश आंबेडकर किंवा कोण काय बोलते. याला महत्त्व नसून लोक काय म्हणतात, हे पाहिले पाहिजे. लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येतील. तसे महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होईल. एक दिल के तुकडे, कोई कहा गिरा कहा गिरा, अशी त्यांची स्थिती होणार आहे, असेही बावनकुळे म्हणाले. तर शहर भाजपमध्ये आमदार आश्विनी जगताप नाराज नसून त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केल्याचेही ते म्हणाले.
फडणवीसांवर बोलताना धंगेकरांनी विचार करावा - बावनकुळे
गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरल्याच्या आमदार रविंद्र धंगेकर यांच्या आरोपांबद्दल बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळातील किंवा त्याआधीच्या सर्व सरकारच्या गृह विभागाचे विषय काढले. तर मालिका दिसतात. बारा बारा बॉम्बस्फोट झाले. ते शरद पावर साहेबांना विचारावे. धंगेकर यांनी पुर्वाश्रमीचा इतिहास बघितला पाहिजे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना विचार करावा. फडणवीसांच्या काळात सर्वाधिक जलद गतीने गुन्ह्यांचा तपास लागला, असेही ते म्हणाले.