Vadgaon Sheri : विरोधकांचा रडीचा डाव, बापूसाहेब तुकाराम पठारेंविरोधात डमी उमेदवार दिल्याने सुरेंद्र पठारेंची टीका

वडगाव शेरी मतदारसंघाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पराभव समोर दिसत असल्याने विरोधकांकडून रडीचा डाव खेळला जात आहे, अशा शब्दात राष्ट्रपती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी सुरेंद्र पठारे यांनी विरोधकांवर टीका केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Wed, 30 Oct 2024
  • 05:37 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

वडगाव शेरी मतदारसंघाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पराभव समोर दिसत असल्याने विरोधकांकडून रडीचा डाव खेळला जात आहे, अशा शब्दात राष्ट्रपती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी सुरेंद्र पठारे यांनी विरोधकांवर टीका केली. वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब तुकाराम पठारे आहेत. मात्र त्यांचेच नाव असलेल्या एका व्यक्तीने वडगाव शेरीतून उमेदवारी अर्ज भरल्यामुळे सुरेंद्र पठारे बोलत होते. 

सुरेंद्र पठारे म्हणाले, श्रीगोंदा येथील रहिवासी असलेल्या बापू बबन पठारे या व्यक्तीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पंधरा मिनिट शिल्लक असताना आपला अर्ज दाखल केला. विरोधातील उमेदवाराचा भाऊ या डमी उमेदवाराला घेऊन अर्ज दाखल करण्यासाठी आला होता. दरम्यान याबाबतीत आता निवडणूक आयोगाकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप सुरेंद्र पठारे यांनी केला.

सुरेंद्र पठारे म्हणाले, उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्वच उमेदवारांचे ऍफीडेव्हीट निवडणूक आयोगाने जाहीर केलें मात्र बापू बबन पठारे यांचे ऍफीडेव्हीट अद्यापही जाहीर केले नाही असा आरोप सुरेंद्र पठारे यांनी केला. या डमी उमेदवारांनी घेतलेल्या कर्जाची नोंद नाही, त्याच्या नावे किती मालमत्ता आहे, बँक बॅलन्स किती आहे याची देखील माहिती निवडणूक आयोगाने दिली नाही. खरंतर उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी त्याची सर्व माहिती लोकांसमोर मांडली पाहिजे अशी अट आहे. मात्र या उमेदवाराच्या बाबतीत कुठलेच नियम पाळण्यात आले नाहीत. निवडणूक आयोगाच्या या कामकाजावर सुरेंद्र पठारे यांनी आक्षेप घेतला असून कुठल्याही नियमांचे पालन न करणाऱ्या बाप्पू बबन पठारे या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest