'लाडक्या बहिणी'च आणणार पुन्हा महायुतीचं सरकार...

Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या पाच वर्षांत भरपूर योजना सुरु करुनही लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळवता आले नव्हते. खोटे नॅरेटिव्ह पसरवून भाजपचा पराभव करण्यात आल्याचा आरोप त्यानंतर झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 4 Nov 2024
  • 12:55 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या पाच वर्षांत भरपूर योजना सुरु करुनही लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळवता आले नव्हते. खोटे नॅरेटिव्ह पसरवून भाजपचा पराभव करण्यात आल्याचा आरोप त्यानंतर झाला. मात्र या सगळ्या चुकीच्या प्रचारावर महायुती सरकारने एक रामबाण उपाय शोधला. गेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु करत राज्यातील सुमारे दोन कोटी बहि‍णींना रक्षापबंधनाची अनोखी भेट दिली. ही योजना आगामी विधानसभा निवडणुकीत मास्टरस्ट्रोक ठरण्याची शक्यता, राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

सरकार लाडक्या बहि‍णींच्या मागे उभे
महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी व स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सरकारकडून दरमहा 1500 रुपये देण्याची ही योजना आहे. 17 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तीवर ती सुरु करण्यात आली. नोव्हेंबरचे पैसे अॅडव्हान्स देत सरकारने आत्तापर्यंत या योजनेचे पाच हप्ते दिले आहेत. शिवाय प्रत्येक पात्र बहिणीला या योजनेचा लाभ घेता यावा, म्हणून आत्तापर्यंत दोनदा या योजनेला मुदतवाढही देण्यात आली होती.

दोन कोटी बहि‍णींनी घेतला फायदा
महाराष्ट्रातील बहिणींच्या पाठीमागे भाजप भावाप्रमाणे भक्कम उभा राहिला. विरोधकांनी ही योजना फक्त निवडणूक जुमला आहे, ती बंद पडणार, दीड हजारांत काय होतंय... अशा नकारात्मक टिका केल्यानंतरही महिलांनी त्याकडे दुर्लक्ष करत या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या योजनेचा लाभ तब्ब दोन कोटी महिलांना देण्यात आल्याची माहिती सरकारने दिली.

भविष्यात मानधन वाढविण्याचा विचार
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस, यांनी या योनजेचा पाया घातला. बंद होणार म्हणून विरोधक टिका करत असले तरी, ही योजना रक्षाबंधनापासून थेट भाऊबीजेपर्यंत पोहोचली आहे. ती भविष्यातही सुरु राहिल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला. शिवाय या योजनेचे मानधन हे दीड हजारांवरून दोन हजार, अडीच हजार, तीन हजार करण्याचा मानसही महायुती सरकारने व्यक्त केला आहे.

अनेक यशोगाथा आल्या समोर
ही योजना 12 वर्षांपूर्वी दिवंगत श्री मनोहर पर्रीकर (गोव्याचे माजी मुख्यमंत्री) यांनी सुरू केली होती आणि पुढे मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि आता महाराष्ट्रात लागू करण्यात आली. लाडकी बहिण योजनेचे आत्तापर्यंत पाच हप्ते म्हणजेच 7,500 रुपये देण्यात आले आहेत. या पैशातून अनेक बहि‍णींनी संसाराला हातभार लावला तर काहींनी आपली स्वप्ने पूर्ण केली. काही लाडक्या बहिणींनी या साडेसात हजार रुपयांतून छोटा-मोठा व्यवसाय सुरु केल्याच्या यशोगाथाही समोर येऊ लागल्या आहेत.

डिसेंबरमध्ये येणार सहावा हफ्ता
लाडकी बहिन योजनेचा सहावा हप्ता लवकरच म्हणजे डिसेंबरमध्ये मिळणार आहे. या योजनेच्या निधीची अर्थसंकल्पातच तरतूद केलेली असल्याने, ही योजना बंद पडणार हा फक्त विरोधकांचा बनाव असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. ही योजना सुरु झाल्यानंतर, लाभार्थी महिलांनी पुन्हा महायुती सरकारलाच सत्तेत आणण्याचे बोलून दाखवले. या योजनेमुळे महायुती सरकारचे पारडे जड समजले जात आहे.

योजनेसाठी सरकारची 46 कोटींची तरतूद
ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच आहे, असा आरोप विरोधकांनी केला. मात्र या योजनेसाठी गेल्या अर्थसंकल्पात 46 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याने, ही योजना कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय या योनजेचा राज्याच्या आर्थिक स्तरावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही सरकारच्यावतीने सांगण्यात येत आहे.

महिलांचा पाठींबा आणि प्रतिसाद
योजनेचे यश टिकवून ठेवण्यासाठी सरकारने आगाऊ पैशाची व्यवस्था केली आहे. महिलांना निवडणूक आचारसंहितेच्या काळातही या याजनेचा लाभ मिळावा म्हणून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच दिवाळीपूर्वी महिलांना सलग दोन महिन्यांचे तीन हजार रुपये देता आले. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही योजना कायमस्वरुपी सुरु राहील, अशी ग्वाही दिली.आचारसंहिता संपल्यानंतर लगेच डिसेंबरचा हप्ताही महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. सरकारची ही सगळी तरतूद पाहता सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest