संग्रहित छायाचित्र
ज्येष्ठ नेते शरद पवार नंतर बारामती माझ्या मागे असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. माझ्या विरोधात उमेदवार देवू नकोस असे भावाला सांगितले होते. युगेंद्र पवारांच्या पराभवावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे भाष्य केलं आहे.
साहेबांच्या नंतर बारामती अजित दादांच्या मागे उभी असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. माझ्या विरोधात सगळं खानदान प्रचारात उतरलं असही अजित पवारांनी म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले, आमचा लोकसभेचा उमेदवार 48 हजारांनी पडला. मी माझ्या भावाला निरोप पाठवला. त्याला म्हटलं तुझ्या पोराला माझ्या विरोधात उभं करू नकोस. त्यावर बारामती साहेबांच्या मागं आहे असं उत्तर मिळालं. त्यावर मी म्हटलं, आहेच. मी कुठे नाही म्हणतोय. पण साहेबांचा नंबर झाल्यावर बारामती दादांच्या मागे आहे. मला लाखाच्या पेक्षा जास्त मतांनी लोकांनी निवडणून दिलं. मी गप्प बसलो. सगळं खानदान माझ्या विरोधात प्रचारात उतरलं होतं.