जरांगेंच्या सभेला हिंसक वळण देण्याचा सरकारचा डाव होता
मनोज जरांगे पाटील यांचे आरोप खरे आहेत. आंतरवाली सराटी येथे झालेल्या जरांगेंच्या सभेला हिंसक करण्याचा सरकारचा डाव होता, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी (दि. १७) केला.
विनायक राऊत म्हणाले, ‘‘मनोज जरांगें च्या सभेला हिंसक वळण लावण्याचा कट राज्यकर्त्यांनी आखला होता. आंदोलनाला हिंसक वळण लागावे, असा डाव शासनातील काही जणांचा होता, पण तो फसला आणि पुढील दुर्घटना टळली.’’
आमदार अपात्रतेप्रकरणाच्या सुनावणीबाबत सर्वोच्च न्यायालयानेच थेट हस्तक्षेप करायला हवा, अशी अपेक्षा एका प्रश्नाच्या उत्तरात राऊत यांनी व्यक्त केली. ‘‘कायद्याचे रक्षण करायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयाला आदेश देण्याशिवाय पर्याय नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायदा मोडला नाही, पण ते प्रचंड वेळकाढूपणा करत आहेत. याचा फायदा थेट शिंदे गटाला होत आहे,’’ अशी बाब राऊत यांनी निदर्शनास आणून दिली.