नोंदणी महानिरीक्षक सोनवणे यांना तात्काळ निलंबीत करा, काँग्रेस आक्रमक

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आमदार मोहन जोशी व आमदार रविंद्र धंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांसमवेत विविध मागण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Mon, 11 Sep 2023
  • 12:14 pm
Congress aggressive : नोंदणी महानिरीक्षक सोनवणे यांना तात्काळ निलंबीत करा, काँग्रेस आक्रमक

नोंदणी महानिरीक्षक सोनवणे यांना तात्काळ निलंबीत करा, काँग्रेस आक्रमक

पुण्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील ढिसाळ कारभाराविरोधात वारंवार मागण्या करून सुध्दा नोंदणी महानिरीक्षक व महसुल मंत्री हे नोंदणीसाठी येणाऱ्या जनतेचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरत आहे. त्यामुळे या प्रकरणाविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आमदार मोहन जोशी व आमदार रविंद्र धंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांसमवेत विविध मागण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी नोंदणी विभागातील अनागोंदी कारभाराविरोधात सातत्याने निवेदने दिली. तसेच पाठपुरावा केला, मात्र महसुलमंत्र्यांनी या संदर्भात कोणतीही दखल घेतली नाही. तसेच, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही. महसुल खाते व्यवस्थित सांभाळता येत नसेल तर विखे पाटील यांनी त्वरीत राजीनामा दयावा.

या आंदोलनावेळी नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांचा फ्लेक्स फोटो जाळुन तसेच सोनवणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून युवक काँग्रेसच्या वतीने नवीन प्रशासकीय इमारत समोर आंदोलन करून निषेध करण्यात आला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest