राज ठाकरेंकडून लेशपाल जवळगे आणि हर्षल पाटीलचा सन्मान
पुण्यातील सदाशिव पेठेत एका महाविद्यालयीन मुलीवर कोयत्याने वार करण्यात आले होते. या हल्ल्यातुन मुलीचे प्राण वाचवणाऱ्या दोन्ही तरुणांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सन्मान केला आहे. हर्षद पाटील आणि लेशपाल जवळगे यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते पुणेरी पगडी व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
मनसे अध्यक्ष मंगळवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी हर्षद आणि लेशपालची भेट घेतली. त्यांनी केलेल्या धाडसाचे कौतुक राज ठाकरे यांनी केले व भविष्यात कोणत्याही मदतीस उपलब्ध आहे, असे आश्वासित केले. त्याचप्रमाणे अमित राज ठाकरे यांनी देखील या तरूणांचा चिंचवड येथे सन्मान केला.
यावेळी बोलताना, राज ठाकरे यांना भेटण्याचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण झाले व त्यांनी मायेने गालावरून जो हात फिरवला, तो आयुष्यभर लक्षात राहिल, असे या तरूणांनी सांगितले. यावेळी मनसेचे नेते अनिल शिदोरे, राजेंद्र वागस्कर शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. मनसे सरचिटणीस ॲड. किशोर शिंदे तसेच सारंग सराफ व शशांक अमराळे यांनीही भेट घडवून आणली होती.