अन्यथा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना महाराष्ट्रात येऊ देणार नाही : शशिकांत तरंगे
चौंडी येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील नवी पेठ येथे धनगर समाजाची राज्यस्तरीय बैठक पार पडली आहे. 17 सप्टेंबर रोजी केंद्राने विषय अधिवेशन बोलावले आहे आणि यामध्ये धनगर समाजाचा मुद्दा देखील घेण्यात यावा तसेच प्रश्न मार्गी लावावा याची मागणी देखील या बैठकीमध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला कॅबिनेटमध्ये अंमलबजावणीसाठी पाठवावे अन्यथा 22 सप्टेंबर 2023 रोजी मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा देखील यावेळी धनगर समाजाकडून देण्यात आला आहे.
धनगर समाजाचा समावेश जोपर्यंत एसटीमध्ये होत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणातून कोणालाही आरक्षण देऊ नये ओबीसी सोडून इतर आरक्षण कोणाला द्यायचे असेल तर त्यामध्ये आमचा काही हस्तक्षेप नाही. धनगर समाजाची फसवणूक संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पक्षांनी केलेली आहे . त्यामुळे आम्ही कोणालाही सपोर्ट करत नाही. काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शेखर भंगाळे यांनी भंडारा टाकला होता या कृतीचा देखील आम्ही समर्थन करत आहोत अशी भूमिका यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.