“एकच मिशन धनगर आरक्षण”, पुण्यात मराठा पाठोपाठ धनगर समाज रस्त्यावर
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या प्रचंड तापला आहे. मात्र, अशातच पुण्यात आज धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. येळकोट येळकोट जय मल्हार तसेच भंडाऱ्याची उधळण करत धनगर समाजाकडून आंदोलन करण्यात आले.
धनगर समाजाचा विश्वासघात भाजपने सरकार केला आहे. आमचा प्रश्न सोडवला नाहीतर आंदोलन अजून तीव्र करू आणि उपमुख्यमंत्री यांची सभा उधळून लावू, असा इशारा देत धनगर समाजाच्या वतीने आंदोलन कऱण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी आता पुण्यात देखील उपोषण सुरू
जालनामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षण उपोषणाला पुण्यातील पर्वती मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पाठिंबा देण्यात आला आहे. कालपासून पुण्यातील इंदिरानगर येथे मराठा समाजाचे कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत. यावेळी हे आंदोलन एखाद्या पक्षाचे नसून हे मराठा समाजाचे आंदोलन आहे. नागरिकांनी एक मराठा म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जात आहे.