निलेश राणेंचं ट्विट अन... महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
लक्ष्मण मोरे
पुणे : माजी खासदार आणि भाजपा पदाधिकारी निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ऐन दसऱ्याच्या दिवशी ट्विट करीत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. कोकण आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात नारायण राणे (Narayan Rane) यांचा राजकीय (Politics) वारसा निलेश आणि नितेश हे दोघे बंधू चालवीत आहेत. त्यातील निलेश यांनी राजकारणातून 'एक्झिट' घेत असल्याचे ट्विट केले अन चर्चांना उधाण आले. राजकारणात मन रमत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणतात, नमस्कार,
मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता
राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.
मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम
दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी
आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि
BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी
मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.
मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही
शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून
कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी
ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस
राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला
पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे
मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं
असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र! अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. यामागे नेमके काय कारण असावे याची जोरदार चर्चा सर्वत्र रंगली आहे.