‘ललित पाटील आगे बढो फडणवीस आपके साथ है’, पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक
पुण्यातील ससून (Lalit Patil) रुग्णालयाच्या समोर आज (बुधवार) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षाच्या (Sharad Pawar group) वतीने ललित पाटील प्रकरणावर संताप व्यक्त करण्यात आला आहे. ससून समोर जमून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. "ललित पाटील आगे बढो महाराष्ट्र सरकार सुमारे साथ है... उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र" अशा प्रकारच्या (NCP) घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. राज्यातील काही बड्या नेत्यांचा यामध्ये हात असल्याचे आरोपही केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून ससून रुग्णालयाच्या समोर आंदोलन करण्यात आले आहे.
‘उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र’, महाराष्ट्र बनलाय ड्रग्स हब, अशा प्रकारची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली आहे. तसेच जर ललित पाटीलवर कारवाई झाली नाही तर इथून पुढच्या काळामध्ये देखील अशाच प्रकारचा आक्रमक पवित्रा पक्ष घेईल, असे मत यावेळेस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलेले पाहायला मिळाले.