सरकारने बुलेट ट्रेनऐवजी विद्यार्थ्यांसाठी १ लाख कोटींचे कर्ज घ्यावे – रोहित पवार
सरकारी कर्मचारी भरती टाळून त्याजागी कंत्राटी भरती करण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. जी काही सरकारी भरती होत आहे. त्यातही प्रचंड प्रमाणात गैरप्रकार होत आहेत. परीक्षा फीच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना लुबाडून आपली तिजोरी भरत आहे. मुला मुलींकडून पैसे वसूल केले जातात. बुलेट ट्रेनसाठी १ लाख कोटींचे कर्ज घेतात. ते कर्ज विद्यार्थ्यासाठी घ्या. राज्याला बुलेट ट्रेनची गरज नाही. एखाद्या नेत्याला खुश करण्यासाठी खर्च करु नका, अन्यथा भविष्यात मोठ आंदोलन करु, अशा इशारा राष्ट्रवादीचे आमदार (शरद पवार गट) रोहित पवार यांनी दिला आहे.
पुण्यातील फुलेवाडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर एमपीएमसी करणाऱ्या विद्यार्थीं लाक्षणिय आंदोलन केले. या आंदोलनात रोहित पवार यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार, नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष व पदाधिकारी उपस्थिती होते. यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत सुद्धा जेव्हा त्यांच्या सरकार नव्हते तिथे जाऊन ते रस्त्यावर झोपले एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन होते. तेव्हा त्यांनी तिथे जाऊन दुर्दैवाने गरीबाच्या फोटो नाटक केला. त्याच्याच बरोबर धनगर आरक्षणाचा विषय जेव्हा त्यांचा सरकार नसते त्यावेळेस घसा कोरडा पडू तर ते तिथे आंदोलनामध्ये बोलतात आणि जेव्हा त्यांची सत्ता येते तेव्हा ते शांत बसतात.”
“मला असं वाटतं की भाजपचे मोठे नेते मुद्दामून या छोट्या नेत्यांना पुढे करतात आणि म्हणतात की या नेत्यांच्या विरोधात बोल पवार साहेबांबरोबर बद्दल बोललो आम्ही समजू शकतो. पण तुम्ही दादा बद्दल बोलता हे भाजप चे राजकारण आहे”, असेही यावेळी रोहित पवार म्हणाले.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, “मुंडे साहेबांपासून पंकजाताईपर्यंत फुंडकर साहेबांपासून आज तुम्ही आडवाणी साहेबांपर्यंत खर्च साहेबांपासून इतर सर्व जे लोक नेते होते. त्यांना काय केले भाजपने संपवले. अशी परिस्थिती ते लोकनेत्याची आहे तर आता इथून तिकडे गेलेल्या नेत्यांचे काय होणार बघा.”
दुष्काळाबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले की, “आता सुद्धा माझ्या मतदारसंघांमध्ये जर बघितलं तर तीन शासकीय टँकर चालू तीन आणि व्यक्तिगत आमचे किती चालू आहेत. तर आमचे आत्ता ४० टँकर चालू आहे. याचे सरकार ला काही पडले नाही. आज पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. आज पीक जाळली आहेत. शेतकऱ्याची मुल शिकत आहेत कसे पैसे भरायचे. मंत्री फक्त दौरे करतात पण फोटो काढतात बाकी काही करत नाही. हे सरकार फोटोछाप सरकार आहे. सरकार ने दुष्काळ जाहीर करावा.”