उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा युवकांनी अडविले
यशपाल सोनकांबळे
पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) तालुक्यातील पणदरे येथील सभा संपल्यानंतर मराठा समाजाच्या युवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी आरक्षणाबाबत (Maratha Aarkshan) तुमची वैयक्तिक भूमिका स्पष्ट करण्याची मागणी युवकांनी केली.
मराठा समाजाच्या विनोद जगताप व अन्य समाजबांधवांनी पवार यांना व्यासपीठावरून उतरताच अडविले. आरक्षणप्रश्नी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी या युवकांनी पवार यांच्याकडे केली. काही वेळांतच तेथे गर्दी जमली. या गर्दीतच पवार यांनी या युवकांना उत्तर दिले.
पवार यावेळी म्हणाले, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लगता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल ही सरकारची भूमिका आहे. वेगवेगळ्या घटकांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली आहे. यामध्ये माहिती घेतली असता इ डब्लूएस मधील 10 टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजातील 8 टक्के लोकांना मिळत आहे. मराठा समाजातील युवक आणि अजित पवार यांच्यातील ही चर्चा सुमारे दहा ते पंधरा मिनिटे भर गर्दीत सुरू होती. त्यानंतर पवार आणि युवक दोघेही निघून गेले.