गतकाळाच्या परंपरेत न रमता सीओईपीने भविष्यातील स्पर्धेचा वेध घ्यावा - चंद्रकांत पाटील

गतकाळाच्या परंपरेत न रमता सीओईपीने भविष्यातील स्पर्धेचा वेध घ्यावा, असे परखड मतराज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 14 Sep 2023
  • 04:32 pm
Chandrakant Patil : गतकाळाच्या परंपरेत न रमता सीओईपीने भविष्यातील स्पर्धेचा वेध घ्यावा - चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

१७० वर्षांची परंपरा लाभलेल्या आणि ४५ हजारांहून अधिक माजी विद्यार्थ्यांची ताकद पाठीशी असलेल्या सीओईपीसारख्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने केवळ गतकाळाच्या परंपरेत न रमता सीओईपीने भविष्यातील स्पर्धेचा वेध घ्यावा, असे परखड मतराज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

कॉलेज ऑफइंजिनिअरिंग पुणेच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे अभियंता दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ‘सीओईपी अभिमान’ पुरस्कारांचे वितरण आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. सीओईपीच्या मुख्यसभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर सीओईपी टेकचे व्हाईस चान्सलरप्रा. एस.डी. आगाशे, बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे चेअरमन प्रमोद चौधरी, मानद सचिव डॉ.सुजीत परदेशी आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षभारत गिते आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कारसोहळ्याचे यंदा ३१ वे वर्ष आहे. यंदाच्या ‘सीओईपी अभिमान’ पुरस्कारानेपुण्यातील ज्येष्ठ उद्योजक, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण कुदळे, मुंबईचे पोलिसआयुक्त आयपीएस विवेक फणसळकरयूएसमधील निअर यूसर्व्हिसेसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष अचलेरकर, ‘अनंत डिफेन्ससिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड’ चे संस्थापक आणि कार्यकारी संचालक चेतन धारिया, उत्कृष्टवैज्ञानिक टीडी (सीएलएडब्ल्यू), एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी, बंगलोरचे डॉ.विजय पटेल, एलिमेंट सोल्युशन्स इंक आणि कुकसन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, भारतचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवी एम. भटकळ यांचा सन्मानकरण्यात आला. तसेच यावेळी बी.टेक. आणि एम.टेक. मध्ये उच्चश्रेणी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी यूएसमधील निअर यू सर्व्हिसेसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषअचलेरकर यांनी दहा कोटी रूपयांची देणगी दिली. यावेळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र कुमार यांनीमहाराष्ट्राला  आयआयटी देण्याचे आणि त्याचेएक केंद्र सीओईपीला देण्याचे सूतोवाच केले आहे. असे सकारात्मक वातावरण असतानासीओईपीने संशोधनावर भर देऊन दिल्ली दरबारी नाममुद्रा उमटवावी, जेणेकरून त्यांनाआयआयटीचे केंद्र मिळणे, सोयीचे होईल. सीओईपीची वाटचाल आणि संशोधन यातएक संथपणा आणि साचलेपणा आल्याचे जाणवत असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. प्रचंडगतीने सभोवतालचे जग बदलत असताना आपल्याला त्या वेगासोबत धावावे लागणार आहे. आजवरसीओईपीला तुलनेने स्पर्धक नव्हते.

मात्र, मंत्री या नात्याने वावरतअसताना खाजगी शैक्षणिक संस्था कोटीच्या कोटी उड्डाणे घेत गुंतवणूक करून अत्याधुनिकसेवासुविधा पुरवत आहेत. असे असताना सीओईपीने ही स्पर्धा वेळीच ओळखणे आवश्यक आहे.ब्रिटीशांनी जी शैक्षणिक व्यवस्था भारतात निर्माण केली, ती केवळ त्यांचाराज्यकारभार चालवणारा नोकरवर्ग निर्माण करण्यासाठी केली होती. त्या परंपरेला छेददेत मोदी सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाव्दारे संशोधन, पेटंट आणि रॉयल्टीही त्रिस्तरीय अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ध्येय उराशी बाळगलेले आहे. तंत्र कौशल्याबरोबरच मूल्याधिष्ठीत आणि मातृभाषेतून शिक्षण देण्यचा आग्रह मोदी धरत असून याव्दारे संशोधनाला पाठबळ आणि प्रोत्साहन मिळेल. मोदी सरकारच्या या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे कोविड काळात आपण भारतातच लस निर्मिती करून कोविडसारख्यामहामारीवर मात केली. एवढेच नव्हे, तर भारताबाहेरील ६० देशांना आपण ही लस पुरवली.तेवढेच मोठे आणि उल्लेखनीय कार्य आपण संरक्षण क्षेत्रात देखील केले आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest