भाजपा पुणे शहर कार्यकारणी जाहीर, गिरीश बापटांच्या सूनेवर मोठी जबाबदारी

दिवंगत भाजप खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांच्या खांद्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडून ही यादी जाहीर करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 18 Sep 2023
  • 10:56 am
Girish Bapat : भाजपा पुणे शहर कार्यकारणी जाहीर, गिरीश बापटांच्या सूनेवर मोठी जबाबदारी

भाजपा पुणे शहर कार्यकारणी जाहीर, गिरीश बापटांच्या सूनेवर मोठी जबाबदारी

भारतीय जनता पार्टीची पुणे शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये दिवंगत भाजप खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांच्या खांद्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडून ही यादी जाहीर करण्यात आली आहे.

धीरज घाटे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कार्यकारणी विस्ताराची मागणी केली होती. त्यानंतर आज ही कार्यकारणी जाहीर कऱण्यात आली आहे. यामध्ये १८ उपाध्यक्ष, ८ सरचिटणीस तर १८ जणांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. युवा मोर्चा अध्यक्षपदी किरण मिसाळ यांची नियुक्ती, तर महिला मोर्चा अध्यक्षपदी हर्षदा फरांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रतीक देसरडा यांच्यावर शहर भा ज पा यु मो प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली असून शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्या शाम देशपांडे यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अशी आहे भाजपची पुणे शहर कार्यकारणी

>>सरचिटणीस

वर्षा तापकीर (भा.ज.पा. महिला आघाडी पुणे शहर प्रभारी)

राजेंद्र शिळीमकर

रवी साळेगावकर

सुभाष जंगले

राघवेंद्र मानकर

पुनीत जोशी

राहुल भंडारे

महेश पुंडे

>>चिटणीस

कुलदीप सावळेकर

किरण कांबळे

किरण बारटक्के

अजय खेडेकर

आदित्य माळवे

राहूल कोकाटे

विवेक यादव

उदय लेले

विशाल पवार

लहू बालवडकर

उमेश गायकवाड

सुनील खांदवे

प्रविण जाधव

हनुमंत घुले

रेश्मा सय्यद

अनिल टिंगरे

आनंद रिठे

दुष्यंत मोहोळ

 

>>उपाध्यक्ष

विश्वास ननावरे

प्रशांत हरसुले

मंजुषा नागपुरे

जीवन जाधव

सुनील पांडे

शाम देशपांडे

प्रमोद कोंढरे

अरुण राजवाडे

तुषार पाटील

स्वरदा बापट

योगेश बाचल

भूषण तुपे

संतोष खांदवे

महेंद्र गलांडे

रुपाली धाडवे

हरिदास चरवड

गणेश कळमकर

प्रतिक देसर्डा ( भा.ज.यु. मो. पुणे शहर प्रभारी)

 

>>युवा मोर्चा अध्यक्ष - करण मिसाळ

>>महिला मोर्चा अध्यक्ष - हर्षदा फरांदे

>>ओ.बी.सी. मोर्चा अध्यक्ष - नामदेव माळवदे

>>अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष - भीमराव साठे

>>अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष - इम्तियाज मोमीन

>>व्यापारी आघाडी अध्यक्ष - उमेश शहा

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest