संग्रहित छायाचित्र
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना या प्रकरणी नियमित जामीन मंजुर करण्यात आला आहे.
भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला होता. मुंबई सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा दिला आहे. एकनाथ खडसे यांच्यविरोधात ईडीने (ED) दाखल केलेल्या भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात न्यायालयाने त्यांना जामीन मंजुर केला आहे.
फडणवीस सरकारच्या काळात महसुल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. .१ कोटी रुपये किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करत सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी पुण्यातील बंडगार्डन पोलिसांत खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
यासाठी एकनाथ खडसे यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने यापुर्वी अंतरीम जामीन मंजुर केला होता. आजच्या सुनावणीत त्यांना मोठा दिलासा मिळाला असून न्यायालयाने नियमित जामीन मंजुर केला आहे. एकनाथ खडसेंचे वकिल मोहन टेकावडे यांनी बाबतची अधिक माहिती दिली आहे.