अमित शहा आणि जेपी नड्डा दोन दिवस पुणे दौऱ्यावर, काय आहे कारण ?

पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणात येत्या गुरुवार ते शनिवार (१४ ते १६ सप्टेंबर) या कालावधीत होणार आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित असणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 12 Sep 2023
  • 11:55 am
Amit Shah : अमित शहा आणि जेपी नड्डा दोन दिवस पुणे दौऱ्यावर, काय आहे कारण ?

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणात येत्या गुरुवार ते शनिवार (१४ ते १६ सप्टेंबर) या कालावधीत होणार आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित असणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी परिवारातील संघटनांची समन्वय बैठक घेतली जाते. त्यानुसार यंदा ही बैठक पुण्यात होणार आहे. मुख्य बैठकीपूर्वी दोन दिवस आणि त्यानंतर दोन दिवसही विशेष बैठका होणार आहेत. त्यासाठी सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे सभागृह, मैदानाची व्यवस्था आणि निवास व्यवस्थेच्या कामांनी वेग घेतला आहे.

संघाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा आणि जेपी नड्डा १४ ते १६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत, सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, यांच्यासह संघ परिवारातील ३५ ते ४० संघटनाचे २५० हुन अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तसेच त्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा होऊन पुढील कार्याची दिशा आणि संघ परिवारातील संघटनांच्या समन्वयाची कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest