अंबादास दानवे ‘गो बॅक’च्या घोषणा, मराठा आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड
मराठा आंदोलन (Maratha) कार्यकर्त्यांना पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. वायसीएम रुग्णालयामध्ये (YCM Hospital) राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) पाहणी दौऱ्यासाठी आले असता त्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना धरपकड केली.
यावेळी अंबादास दानवे गो बॅकच्या घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणाही देण्यात आल्या.
दिवसेंदिवस राज्यातील मराठा आंदोलन तीव्र होत चालले असून गावागावात आमदार, खासदारांचे रस्ते अडवले जात असून, काही गावात देखील नेत्यांना बंदी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी चाकण परिसरात वाहने अडविण्याचा प्रयत्न झाला होता.