DelhiElections2025 : दिल्लीतील २ जागांवर 'आप'ने उमेदवार बदलले, उमेदवारांची सुधारित यादी जाहीर

आम आदमी पक्षाने बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सुधारित यादी जाहीर केली. ज्या अंतर्गत पक्षाने नरेला आणि हरीनगर मतदारसंघातील त्यांचे पूर्वी घोषित केलेले उमेदवार बदलले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Wed, 15 Jan 2025
  • 04:02 pm

संग्रहीत छायाचित्र

पुणे- आम आदमी पक्षाने बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सुधारित यादी जाहीर केली. ज्या अंतर्गत पक्षाने नरेला आणि हरीनगर मतदारसंघातील त्यांचे पूर्वी घोषित केलेले उमेदवार बदलले आहेत. पक्षाने आता नरेला मतदारसंघातून शरद चौहान यांना तिकीट दिले आहे, तर सुरिंदर सेतिया यांना हरीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

यापूर्वी पक्षाने नरेला येथून दिनेश भारद्वाज यांना तिकीट दिले होते. तर राजकुमारी ढिल्लन यांना हरीनगर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले होते.

Share this story

Latest