Maharashtra Politics : शहांवरील टीकेमुळे भाजप संतप्त...! थेट दाऊदच नाव घेऊन विनोद तावडेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

भाजप नेते विनोद तावडे यांनी त्यांच्या एक्स हँडलवर शरद पवारांना काही सवाल विचारले आहेत. दोन जन्मठेपांची, काळ्यापाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का?

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 15 Jan 2025
  • 03:11 pm
Amit Shah vs Sharad Pawar,

प्रातिनिधिक छायाचित्र....

मुंबई : शिर्डीतील भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलताना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. १९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं, त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं, अशी टीका शाह यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेवर उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शहा यांचा तडीपार मंत्री असा उल्लेख केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

भाजप नेते विनोद तावडे यांनीही शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दोन जन्मठेपांची-काळ्यापाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का? असा सवाल तावडे यांनी विचारला आहे.

दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटरमध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती! दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा मा. पवार साहेब विसरले आहेत असं विनोद तावडे म्हणाले.

भाजप नेते विनोद तावडे यांनी त्यांच्या एक्स हँडलवर शरद पवारांना काही सवाल विचारले आहेत. दोन जन्मठेपांची, काळ्यापाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का? अटलजी, अडवाणीजी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात 17 महिने तुरुंगात होते. ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधान झाले. त्यांच्याविषयी देखील हेच म्हटले असते का? हे पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितले पाहिजे असे आव्हान तावडे यांनी दिले आहे.

1978 मध्ये शरद पवार यांनी बंडखोरी करुन विश्वासघात करण्याचे जे राजकारण केलं, त्यावेळी त्यांना महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवण्याचं काम केलं असं अमित शाह शिर्डीतील अधिवेशनात बोलले होते.

Share this story

Latest