शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्ते का बंद केले?
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अनेक भागातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. रस्ते बंद करण्यावरून पंजाब, हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारला धारेवर धरले आहे. एका जनहित याचिकावरील सुनावणीदरम्यान पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, शेतकरी राष्ट्रीय महामार्गावर जमत होते कारण त्यांना एकत्र येण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे. याशिवाय न्यायालयाने याप्रकरणी पंजाब सरकारवरही ताशेरे ओढले आहेत. हरियाणातील सीमा बंद आणि इंटरनेट सेवांवर बंदी घालण्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती जीएस संधावालिया आणि न्यायमूर्ती लुपिता बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. सरकारविरोधात पुन्हा एकदा शेतकरी आपल्या मागण्या घेऊन दिल्लीकडे कूच करत आहेत.