...तर भाजपला केवळ १०० जागांवर रोखणार

कुठलाही आडपडदा न ठेवता काँग्रेसने देशातील सर्व विरोधकांना एकत्रित घेण्याची तयारी दाखवली तर आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला केवळ १०० जागांवर रोखू शकतो, त्यामुळे काँग्रेसने वेळ न घालवता तत्काळ निर्णय घ्यावा, असे आवाहन शनिवारी संयुक्त जनता दलाचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले आहे. जर विरोधकांची आघाडी शक्य झाली नाही तर भाजपला कोणीच पराभूत करू शकणार नसल्याचा इशाराही नितीश यांनी यावेळी दिला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 19 Feb 2023
  • 04:28 pm
...तर भाजपला केवळ १०० जागांवर रोखणार

...तर भाजपला केवळ १०० जागांवर रोखणार

नितीशकुमार यांनी सांगितला विजयाचा फॉर्म्युला; ऐक्यासाठी काँग्रेसला घातली गळ

#पाटणा

कुठलाही आडपडदा न ठेवता काँग्रेसने देशातील सर्व विरोधकांना एकत्रित घेण्याची तयारी दाखवली तर आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला केवळ १०० जागांवर रोखू शकतो, त्यामुळे काँग्रेसने वेळ न घालवता तत्काळ निर्णय घ्यावा, असे आवाहन शनिवारी संयुक्त जनता दलाचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले आहे. जर विरोधकांची आघाडी शक्य झाली नाही तर भाजपला कोणीच पराभूत करू शकणार नसल्याचा इशाराही नितीश यांनी यावेळी दिला आहे.

पाटण्यात आयोजित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ११ व्या राष्ट्रीय अधिवेशनात नितीशकुमार बोलत होते. पंतप्रधानपदासाठी माझी व्यक्तिगत अशी महत्त्वकांक्षा नाही, याबाबत सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत जो काही निर्णय घेतला जाईल, तो मी मान्य करायला तयार आहे. आम्ही काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहतो आहोत, त्यासाठी मी दिल्लीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना भेटलो होतो. त्यामुळे आता त्यांनी तत्काळ निर्णय घ्यायला हवा, असे नितीशकुमार म्हणाले आहेत. देशातील सर्व विरोधकांनी एकजूट दाखवली तर भाजपला लोकसभा निवडणुकीत १०० जागांवर रोखता येऊ शकते. बिहारमध्ये आम्ही जो प्रयोग केला तोच केंद्रातील सत्ताबदलासाठी वापरला जावा, अशी आपली सूचना आहे. काँग्रेसने सगळ्या समविचारी पक्षांना एकत्र घेऊन हा लढा लढण्याची तयारी दाखवायला हवी. सध्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहासही बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सगळ्या जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन राजकीय संघर्ष करायला हवा. या अधिवेशनाला नितीशकुमार यांच्याखेरीज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव उपस्थित होते.  

पहिल्यांदा प्रस्ताव कोण पाठवणार ?

भाजपला रोखण्यासाठी देशभरातील विरोधकांना एकत्र येण्याचे नितीशकुमार यांचे आवाहन पटलेल्या सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या म्हणण्याला संमती दिली. मात्र पहिल्यांदा या ऐक्यासाठी पुढाकार कोण घेणार, काँग्रेसला हा प्रस्ताव कोण पाठवणार, अशी शंका उपस्थित केली. आज देशभरात गुजरात मॉडेलची चर्चा  होते. या मॉडेलला बिहार मॉडेलने उत्तर द्यायला हवे. उत्तर प्रदेशात काँग्रेस, साम्यवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता पक्षाने एकत्रित येण्याची इच्छा व्यक्त केली असली तरीही समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने २०२४ ची लोकसभा निवडणूक स्वतंत्ररीत्या लढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे देशातील विरोधकांना एकत्रित आणण्याची जबाबदारीही कोणीतरी घेण्याची गरज असल्याचे खुर्शीद यांनी नितीशकुमार यांना सांगितले. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest