संग्रहित छायाचित्र
बंगळुरूमध्ये फटाका असलेल्या डब्यावर बसल्यावर तुला रिक्षा देतो. अशी पैज मित्रांमध्ये लागते. पुढे फटाका फुटल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याची घडली. कर्नाटकातील बंगळुरू येथील एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये डब्यावर एक तरुण बसलेला दिसतो. अचानक डब्यात स्फोट होतो आणि तो तरुण जमिनीवर कोसळतो.
या घटनेचा व्हीडीओ समोर आल्याचे एसपींनी सांगितले. शबरीशच्या मित्रांची ओळख पटवल्यानंतर ६ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबरीश आणि त्याच्या मित्रांनी दिवाळीच्या रात्री दारू प्राशन केली होती. यानंतर सर्वजण बंगळुरूच्या कोननकुंटे परिसरात जमा झाले. त्याच्या मित्रांनी बेरोजगार शबरीशला ऑटोरिक्षा घेऊन देऊ असे सांगितले. त्याला फटाके असलेल्या पेटीवर बसण्याची अट घालण्यात आली होती. नशेत असलेल्या शबरीशने अट मान्य केली. मित्रांनी फटाका पेटवला आणि त्यावर एक बॉक्स ठेवला. त्यावर शबरीश बसला. त्याचे मित्र तेथून निघून गेले. फटाका फुटला आणि शबरीश हवेत उडून रस्त्यावर पडला.
काही सेकंदांनी तो रस्त्यावर आडवा झाला. शबरीशचे मित्र त्याच्याकडे आले. उचलायला सुरुवात केली पण शबरीश उठला नाही. यानंतर सर्व मित्रांनी शबरीशला रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दक्षिण बंगळुरूचे एसपी लोकेश जगलासर यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, स्फोटामुळे शबरीशच्या खासगी भागावर खोलवर जखमा झाल्या आहेत. यामुळे त्याचा मृत्यू झाला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.