गुगल मॅपचा प्रताप, कार थेट नदीत!

गुगल मॅपवर विश्वास ठेवून वाहत्या नदीत कार नेणे दोन युवकांच्या अंगलट आले आहे. त्यांची कार एका झाडाला अडकल्याने दोघांचा जीव कसाबसा वाचला आहे. केरळच्या सुदूर उत्तर कासरगोड जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 1 Jul 2024
  • 03:30 pm
National News, google map Failure

संग्रहित छायाचित्र

कर्नाटकातून केरळमध्ये जाताना घेतला गुगल मॅपचा आधार

नवी दिल्ली: गुगल मॅपवर विश्वास ठेवून वाहत्या नदीत कार नेणे दोन युवकांच्या अंगलट आले आहे. त्यांची कार एका झाडाला अडकल्याने दोघांचा जीव कसाबसा वाचला आहे. केरळच्या सुदूर उत्तर कासरगोड जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुण कर्नाटकातून काही कामानिमित्त केरळला जात निघाले होते. रस्ता माहीत नसल्याने त्यांनी गुगल मॅप सुरू केला होता. मात्र या मॅपनुसार जात असताना त्यांची कार थेट वाहत्या नदीत पोहोचली. सुदैवाने या तरुणांची कार एका झाडाला जाऊन अडकली.

संकटात अडकलेले असताना दोघांनीही मदतीसाठी अग्निशमन दलाला फोन केला आणि आपले लोकेशन त्यांना शेअर केले.  काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि रस्सीच्या साहाय्याने दोन्ही तरुणांचा जीव वाचवला. घटनेत बचावलेला तरुण अब्दुल रशीद यांनी सांगितले की, गुगल मॅप्सवर त्यांना नदीऐवजी रस्ता दाखवण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी कार तशी पुढे नेली. मात्र पुढे पाणी आहे कळण्याआधीच कार पुढे गेली. कार एका पुलावर पोहोचली होती. मात्र तिथे दोन्ही बाजूने पाणी भरले होते. कार अचानक पाण्याच्या प्रवाहात वाहू लागली आणि एका झाडाला अडकली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आमचा जीव वाचवला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest