जातीबाह्य प्रेमसंबंधामुळे बापानेच संपवले मुलीला

जातीभेद दूर करण्यात आल्याचे कितीही दावे करण्यात येत असले तरीही जातीभेदाची दरी रूंदावली असल्याचे वास्तव समोर येत आहे. केवळ जातीबाहेरच्या युवकाशी प्रेमसंबंध ठेवल्याच्या कारणामुळे जन्मदात्या बापानेच मुलीची हत्या केल्याचा प्रकार कर्नाटकात घडला आहे. या प्रकरणी संबंधित पित्याला अटक करण्यात आली असून मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या प्रियकराने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 29 Jun 2023
  • 08:56 am
जातीबाह्य प्रेमसंबंधामुळे बापानेच संपवले मुलीला

जातीबाह्य प्रेमसंबंधामुळे बापानेच संपवले मुलीला

कर्नाटकात 'ऑनर किलिंग'; मुलीच्या प्रियकरानेही केली आत्महत्या

#बंगळुरू

जातीभेद दूर करण्यात आल्याचे कितीही दावे करण्यात येत असले तरीही जातीभेदाची दरी रूंदावली असल्याचे वास्तव समोर येत आहे. केवळ जातीबाहेरच्या  युवकाशी प्रेमसंबंध ठेवल्याच्या कारणामुळे जन्मदात्या बापानेच मुलीची हत्या केल्याचा प्रकार कर्नाटकात घडला आहे. या प्रकरणी संबंधित पित्याला अटक करण्यात आली असून मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या प्रियकराने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

कोलार जिल्ह्यातील बोदागुरकी गावात मंगळवारी (२७ जून) ही घटना घडली. या मुलीचे तिच्या गावातीलच एका जातीबाहेरच्या मुलावर प्रेम असल्याचे समजल्यानंतर मुलीच्या कुटुंबात मोठा वाद झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी या मुलीची हत्या झाल्याची बाब समोर आली आहे. हे समजताच त्या मुलानेही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे नेमका प्रकार?

२० वर्षांची किर्ती पदवीचे शिक्षण घेत होती. किर्तीचे त्यांच्या घराशेजारीच राहणाऱ्या २३ वर्षीय गंगाधरवर प्रेम होते. कीर्ती इतर मागासवर्गीय प्रजातीची होती आणि तिचा प्रियकर अनुसूचित जातीचा होता.  त्यामुळे कीर्तीच्या कुटुंबीयांना ही बाब पसंत नव्हती. यावरून सोमवारी संध्याकाळी किर्तीच्या घरी मोठा वाद झाला. दुसऱ्याच दिवशी सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान किर्तीची श्वास कोंडून हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली. ही हत्या किर्तीच्या वडिलांनीच तिची हत्या केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. दरम्यान, मुलीच्या आंतरजातीय आणि त्यातही खालच्या जातीतील मुलाशी प्रेमसंबंधांना कृष्णमूर्तीचा विरोध होता. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांच्या विरोधानंतरही कृष्णमूर्ती किर्तीचे गंगाधरशी लग्न लावून देण्यास तयारही झाला होता. मात्र, सोमवारी संध्याकाळी किर्तीच्या या प्रेमसंबंधांमुळे घरात मोठा वाद झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी किर्तीची हत्या झाल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी कृष्णमूर्तीला अटक केली असून त्याची सखोल चौकशी केली जात आहे.

गंगाधरची आत्महत्या

गंगाधरला किर्तीच्या हत्येची माहिती मिळाल्यानंतर त्याने तिच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली. त्यानंतर त्याचा भाऊ त्याला धीर देण्यासाठी बाईकवरून बाहेर घेऊन जात असताना त्याने मध्येच रस्त्यात भावाला बाईक थांबवायला सांगितली. खाली उतरताच गंगाधरने बाजूच्या रेल्वे ट्रॅकवरून वेगाने येणाऱ्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी कामसमुद्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest