संग्रहित छायाचित्र
सुप्रीम कोर्टाचं अधिकृत यूट्यूब चॅनेलवर आज (शुक्रवारी) सायबर हल्ला झाला. सुप्रीम कोर्टाचं अधिकृत यूट्यूब चॅनेल हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर कोर्टातील सुनावणींच्या थेट प्रक्षेपणाऐवजी XRP या अमेरिकन कंपनीने विकसित केलेल्या क्रिप्टोकरन्सीची जाहिरात करणारे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आले आहेत. याबाबत सुप्रीम कोर्टाच्या तंत्रज्ञान विभागाच्या रजिस्टारकडून माहिती देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेल्या शेवटच्या सुनावणीचा व्हिडिओ हॅकर्सनी प्रायव्हेट केला आणि 'ब्रॅड गार्लिंगहाऊस: रिपल रिस्पॉन्ड्स टू द एसईसी $२ बिलियन फाइन एक्सआरपी प्राइस प्रिडिक्शन' या नावाचा एक ब्लँक व्हिडिओ हॅक केलेल्या युट्यूब चॅनेलवर लाइव्ह केला.
सुप्रीम कोर्टाच्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या खंडपीठासमोरील खटल्यांच्या सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण केले जाते. याशिवाय त्यावर सुनावणीचे व्हिडीओ ही अपलोड केले जातात. २०१८ मध्ये सर्व घटनापीठांच्या सुनावणी यूट्यूब चॅनेलवर थेट प्रसारित केल्या जातील असा निर्णय घेतला गेला. २७ सप्टेंबर २०२२ ला सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे पहिले थेट करण्यात आले होते.
अज्ञात व्यक्तीकडून हे चॅनल हॅक करण्यात आले आहे. सुनावणीचे व्हिडीओ गायब करण्यात आले असून त्यावर XRP क्रिप्टोकरन्सीची जाहिरात दिसत आहे. XRP क्रिप्टोकरन्सी यूएस-आधारित कंपनी Ripple Labs ने विकसित केली आहे.