लघुशंका करणाऱ्याचे ब्राह्मण महासभेकडून समर्थन

आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका करणाऱ्या भाजप आमदार प्रवेश शुक्ला याचे समर्थन करण्यासाठी ब्राह्मण महासभा मैदानात उतरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ब्राह्मण महासभेने प्रवेश शुक्लावरील कारवाईविरोधात आंदोलन केल्याचा एक व्हीडीओ महाराष्ट्र काँग्रेसने शेअर केला असून एक आंदोलक प्रवेश शुक्लाचे समर्थन करताना दिसतोय.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 12 Jul 2023
  • 11:22 am
लघुशंका करणाऱ्याचे ब्राह्मण महासभेकडून समर्थन

लघुशंका करणाऱ्याचे ब्राह्मण महासभेकडून समर्थन

#भोपाळ 

आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका करणाऱ्या भाजप आमदार प्रवेश शुक्ला याचे समर्थन करण्यासाठी ब्राह्मण महासभा मैदानात उतरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  ब्राह्मण महासभेने प्रवेश शुक्लावरील कारवाईविरोधात आंदोलन केल्याचा एक व्हीडीओ महाराष्ट्र काँग्रेसने शेअर केला असून एक आंदोलक प्रवेश शुक्लाचे समर्थन करताना दिसतोय.  

लघुशंकेचा संतापजनक व्हीडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. ज्यामध्ये  प्रवेश शुक्ला आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका करताना दिसत होता. मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्याच्या कुब्री गावात ही घटना घडली होती. शुक्ला आदिवासी मजुरावर दादागिरी करत अंगावर, चेहऱ्यावर आणि डोक्यावर लघुशंका करताना दिसत होता. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या आदेशानंतर  प्रवेश शुक्लाला अटक करून गुन्हा दाखल केला होता. तसेच आरोपीच्या घराचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. 

व्हीडीओ शेअर करत महाराष्ट्र काँग्रेसने म्हटलं आहे की, हा नीचपणाचा कळस! प्रवेश शुक्लाच्या समर्थनार्थ ब्राम्हण महसभेतर्फे आंदोलन. त्यांचे तर्क आणि भाषा ऐकली की हे लोक माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचे वाटत नाहीत.

काँग्रेसच्या दाव्यानुसार व्हीडीओमध्ये दिसणारा आंदोलक ब्राह्मण महासभेचा कार्यकर्ता आहे. आंदोलक पत्रकाराच्या प्रश्नावर म्हणतो की, कसला अपराध, लघुशंका करणे हा अपराध? कोणत्या कलमाअंतर्गत हा अपराध आहे? ती व्यक्तीसुद्धा (आदिवासी मजूर) नशेत होती. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणे हा गुन्हा आहे.           वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest