स्मृतींनी घेतले नवे घर, जनतेला केले 'बेघर'

लोकसभा निवडणूक निकालातील आतापर्यंतचे कल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशच्या निकालाने अनेकांना चकीत केले आहे. ८० लोकसभेच्या जागा असलेल्या राज्यामध्ये भाजप ४० जागांपर्यंतही पोहोचू शकला नाही तर इंडिया आघाडीने ४० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत अमेठीतून भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना हरवले होते. मात्र यंदा स्मृती इराणी यांचाच पराभव झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Wed, 5 Jun 2024
  • 05:35 pm
Lok Sabha elections

संग्रहित छायाचित्र

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना मतदारांनी दिला धक्का, काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांचा विजय

#नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकालातील आतापर्यंतचे कल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशच्या निकालाने अनेकांना चकीत केले आहे.  ८० लोकसभेच्या जागा असलेल्या राज्यामध्ये भाजप ४०  जागांपर्यंतही पोहोचू शकला नाही तर इंडिया आघाडीने ४० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.  २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत अमेठीतून भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना हरवले होते. मात्र यंदा स्मृती इराणी यांचाच पराभव झाला आहे.   

 इराणींना काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी जोरदार टक्कर दिली आहे. स्मृती इराणींनी नुकतेच अमेठीमध्ये स्वत:चे घर बनवले होते. मात्र जनतेने त्यांना त्याच मतदारसंघातून आता बेघर केले आहे.

अमेठी लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे राहुल गांधी आणि भाजपच्या स्मृती इराणी यांच्यात टक्कर झाली होती. स्मृती इराणींनी राहुल यांना हरवत २०१४ मध्ये झालेल्या पराभवाचा सूड घेतला होता. आता काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी त्यांना हरवत पुन्हा एकदा अमेठीची जागा आपल्याकडे घेतली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्मृती इराणींनी किशोरी लाल यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी किशोरी लाल शर्मा यांना ‘चौकीदार’ म्हटले होते. यंदा काँग्रेस अमेठीसोबतच रायबरेली मतदारसंघातूनही हरणार, असा विश्वास इराणींनी व्यक्त केला होता. राहुल गांधी यांनी रायबरेली या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी दिनेश प्रताप सिंह यांना हरवले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा ज्याप्रकारे पराजय झाला, त्याची कोणी कल्पनाच केली नव्हती. विविध एजन्सींच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ६८ जागा सांगितल्या होत्या. तर इंडिया आघाडीला फक्त १२ जागा मिळणार असल्याचा अंदाज होता. मात्र निवडणुकीच्या निकालाने एक्झिट पोल्सना ‘फोल’ ठरवत भाजपला मोठा धक्का दिला आहे. दुसरीकडे समाजवादी पार्टीनेही या निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने पाच जागा जिंकल्या होत्या. यावेळी ३४ जागांवर सपा आघाडीवर आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest