'स्माइलिंग बुद्धा' बनले नागालँडचे मंत्री

नागालँडमध्ये एनडीपीपी नेते नेफियू रिओ यांनी पाचव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकीत एनडीपीपी-भाजप युतीने ३७ जागा जिंकल्या आहेत. भाजपने एनडीपीपीसोबत युती केली आहे. २०१८ च्या निवडणुकीत रिओ यांनी भाजपसोबत युती केली होती. गेल्या निवडणुकीत युतीला ३० जागा मिळाल्या होत्या, यावेळी युतीने ३७ जागा जिंकल्या. मात्र, राज्यात सर्वपक्षीय सरकार स्थापन झाले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 8 Mar 2023
  • 12:28 am
'स्माइलिंग बुद्धा' बनले नागालँडचे मंत्री

'स्माइलिंग बुद्धा' बनले नागालँडचे मंत्री

नेफियू रिओ यांनी घेतली सलग पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ

#कोहिमा

नागालँडमध्ये एनडीपीपी नेते नेफियू रिओ यांनी पाचव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकीत एनडीपीपी-भाजप युतीने ३७ जागा जिंकल्या आहेत. भाजपने एनडीपीपीसोबत युती केली आहे. २०१८ च्या निवडणुकीत रिओ यांनी भाजपसोबत युती केली होती. गेल्या निवडणुकीत युतीला ३० जागा मिळाल्या होत्या, यावेळी युतीने ३७ जागा जिंकल्या. मात्र, राज्यात सर्वपक्षीय सरकार स्थापन झाले आहे.

या मंत्रिमंडळात भाजपचे स्माइलिंग बुद्धा तेमजेन इमना अलोंग यांनी देखील शपथ घेतली आहे. नागालँड निवडणुकीत भाजप आघाडीच्या विजयाबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तेमजेन इमना अलोंग खूप आनंदी आहेत. नागालँड निवडणुकीत स्वतःसाठी आणि पक्षासाठी जागा जिंकल्याबद्दल त्यांनी एक मजेदार ट्विटदेखील केले होते. आपल्या राजकीय गोष्टी आपल्या गमतीशीर आणि विनोदी शैलीत सांगण्यासाठी तेमजेन इमना अलोंग प्रसिद्ध आहेत. यासोबतच ते त्याच्या पारंपरिक ड्रेसमध्ये सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांची शैली अनेकांना आवडते. सोशल मीडियावर त्यांचे अनेक 

फॉलोअर्स आहेत.

नागालँड सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नागालँडचे राज्यपाल ला गणेशन, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा या शपथ ग्रहण सोहळ्याला उपस्थित होते. 

७२ वर्षीय रिओ त्यांच्या राज्यात सर्वपक्षीय सरकारचे नेतृत्व करणार आहेत. राज्यात विरोधी पक्ष राहणार नाही. 

नागालँडमध्ये यापूर्वी दोनदा सर्वपक्षीय सरकार स्थापन झाले आहे. जी कैटो आये, जेकब झिमोमी, केजी केन्ये, पी पायवांग कोन्याक, मेत्सुबो जमीर,  तेमजेन इमना अलोंग, सीएल जॉन, सल्हौतुओनूओ क्रुसे आणि पी बाशांगमोंगबा चांग यांच्यासह नऊ आमदारांनी नागालँड मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest